ओकिनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कुमारी अद्विता आनंद हासे हिचे दैदिप्यमान यश

0
341

युवावार्ता (प्रतिनिधी):
संगमनेर – पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या ओकिनावा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत संगमनेरच्या कुमारी अद्विता आनंद हासे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत काता प्रकारात तिने रौप्य पदक आणि स्पायरींग प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. अद्विताच्या या कामगिरीमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुण्याच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतभरातील शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. संगमनेर कराटे अकॅडमीचे संचालक दत्ता भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील शंभरहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. संघाने द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक पदके मिळवून राष्ट्रीय उपविजेतेपद प्राप्त केले.

कुमारी अद्विता हासे ही अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत असून ती अतिशय हुशार आणि मेहनती आहे. याआधीही तिने विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. लहान वयातच मिळवलेल्या या यशामुळे ती एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पुढे येत आहे. अद्विता ही दैनिक युवावार्ता चे संस्थापक आणि संपादक किसन भाऊ हासे यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या शाळेतील शिक्षक, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने तिच्या या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक केले आहे. संगमनेर कराटे अकॅडमीच्या प्रशिक्षक दत्ता भांदुर्गे यांनी अद्विताचे कौतुक करताना तिच्या जिद्द आणि चिकाटीचे विशेष उल्लेख केले.

दैनिक युवावार्ता आणि युवा पॉलिप्रिंट व पॅकेजिंग इंडस्ट्रीजच्या वतीने कुमारी अद्विताचे अभिनंदन करण्यात आले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तिने आणखी मोठ्या यशाची नोंद करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अद्विता हासेच्या या यशामुळे संगमनेर शहराचे नाव उज्वल झाले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here