लाईव्ह उपडेट
संगमनेर (दैनिक युवावार्ता) महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत आहे. दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार की नाना पटोले? अपक्ष आणि छोटे पक्ष किंगमेकर बनतील का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारी 12 वाजेपर्यंत मिळतील.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले होते. 2019 च्या तुलनेत यावेळी 4% जास्त मतदान झाले. 2019 मध्ये 61.4% मतदान झाले. यावेळी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल आले. यावेळी 65.11% मतदान झाले. 11 पैकी 6 पोलमध्ये भाजप युती म्हणजेच महायुती सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 4 निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी (MVA) आणि एका मतदानात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ 12:00 पर्यंत
वर्सोवा विधानसभेचे लाइव्ह अपडेट्स
दहाव्या फेरी अखेर
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून दहाव्या फेरीअखेरीस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हरून खान यांनी आघाडी घेतली आहे हरून खान यांना दहाव्या फेरीअखेरीस 31 हजार 499 इतकी मते मिळाली असून हारून खान यांनी आतापर्यंत घेतलेली आघाडी 6856 मतांची आहे.
भारती लव्हेकर भाजप 25 हजार 643
संदेश देसाई मनसे 1844
हारुण खान शिवसेना ठाकरे 31499
लष्करी या एमआयएम 2083
राजू पेडणेकर अपक्ष 4877
एकूण मते 68 हजार 934
घेतलेली आघाडी. 6856
जिल्ह्याचे निकालाचे अपडेट्स
केज विधानसभा फेरी क्रमांक 16 अखेर नमिता मुंदडा – 61750 पृथ्वीराज साठे – 57638 नमिता मुंदडा – 4112 आघाडी —— बीड विधानसभा 15 वी फेरी अखेर
संदीप क्षीरसागर 59003 योगेश क्षीरसागर 47996 संदीप क्षीरसागर आघाडी 1107 —— गेवराई विधानसभा फेरी क्रमांक 20 अखेर विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) 33730 मतांनी आघाडीवर फेरी क्र.-21 वी फेरी अखेर विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) 35238 मतांनी आघाडीवर
सकाळ 12:00 पर्यंत
अहमदनगर शहरचे अपडेट्स- जगताप आघाडीवर
पंधरावी फेरी अखेर २४२९५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
पंधरावी फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ४८७१ अभिषेक कळमकर ३६३८
सकाळ 11:45 पर्यंत
आदित्य ठाकरे 600 मतांनी मागे
वरळी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांच्यापेक्षा 600 मतांनी पिछाडीवर आहेत.
सकाळ 11:30 पर्यंत
कोथरूडमध्ये चंद्रकांत दादा पाटील 24 हजार मतांनी आघाडीवर
सकाळ 11:00 पर्यंत
बारामतीतून अजित पवार पुढे
बारामतीत सहाव्या फेरीची मतमोजणी संपल्यानंतर अजित पवार 27556 मतांनी आघाडीवर आहेत.
कोपरी-पाचपाखाडीमधून शिंदे 3746 मतांनी आघाडीवर
पाचव्या फेरीनंतर कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे 3746 मतांनी आघाडीवर आहेत.
सकाळ 10:45पर्यंत
औरंगाबाद मध्य चौथी फेरी, जैस्वाल आघाडीवर
- महायुती प्रदीप जैस्वाल- 20419
- मविआ बाळासाहेब थोरात -8050
-एमआयएम नासेर सिद्दीकी – 8361
चौथी फेरी अखेरीस प्रदीप जैस्वाल 12058 मताने आघाडीवर
सकाळ १०: २० पर्यंत
अजित पवार : ८२८७ युगेंद्र पवार : ४२१३
तिसऱ्या फेरीत एकूण आघाडी: 4074
चौथ्या फेरीअखेर अजित पवार १५२४८ मतांनी आघाडीवर आहेत.
सकाळ १०: १५ पर्यंत
संभाजीनगर मध्य, पूर्व आणि पश्चिममध्ये चुरस
औरंगाबाद मध्य 107 जैस्वाल प्रदीप शिवनारायण आघाडीवर आहेत त्यांनी 3342 मतांनी आघाडी घेतली. त्यांच्या विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) सिद्दिकी नसरुद्दीन तकीउद्दीन हे रिंगणात आहेत.
औरंगाबाद पूर्व 109
मतदारसंघात इम्तियाज जलील सय्यद हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे उमेदवार सध्या 23539 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्षाचे उमेदवार अब्दुल गफ्फार कादरी सय्यद हे आहेत. औरंगाबाद पश्चिम 108 शिवसेनेचे उमेदवार संजय पांडुरंग शिरसाट हे 7753 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजू रामराव शिंदे हे रिंगणात आहेत.
10:00 पर्यंत
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मागे, नवाब मलिकही मागे
मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून सपा नेते अबू आझमी आघाडीवर आहेत. या जागेवरून राष्ट्रवादीचे नवाब मलिक मागे पडले आहेत.
माहीममधून शिवसेनेचे (यूबीटी) महेश सावंत आघाडीवर आहेत. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे येथून पिछाडीवर आहेत.