बंदूकीचा धाक दाखवून सोन्याचे दुकान लुटले
हवेत गोळीबार करत धुमस्टाईलने फरार
पारनेरच्या दिशेने पोलीसांकडून पाठलाग
युवावार्ता (प्रतिनिधी)
साकुर – संगमनेर तालुक्यातील संगमनेर नंतर सर्वात मोठी बाजारपेठ असणार्या साकूर येथे आज सोमवारी भर दुपारी दिड वाजता दरोडेखोरांचा थरार समोर आला. दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बसस्थानकाजवळील कान्हा ज्वेलर्स दूकान लूटून नले. या लुटीनंतर सदर चोरट्यांनी भर गर्दीमध्ये हवेत गोळीबार करत घटनास्थळावूनर धुमस्टाईलने पळ काढला. ही घटना समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, घारगाव पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकाने पारनेरच्या दिशेने पळालेल्या चोरट्यांना पाठलाग सुरू केला आहे. दरम्यान या रस्त्त्यातील मांडवे फाटा, खडकवाडी याठिकाणी नागरीकांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. चोरट्यांनी हवेत गोळीबार करत धुम ठोकली. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीसांच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
दुकानात चोरी करतांनाचा सीसिटीव्ही कॅमेर्यात कैद
सविस्तर माहिती अशी की, साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांचं कान्हा ज्वेलर्सचे दूकान आहे. दुपारी दिड वाजेच्या सुमारास पल्सर गाडीवर पाच दरोडेखोरांनी येऊन दुकानात प्रवेश केला. निखिल लोळगे व तेथे असलेल्या एका ग्राहकाला बंदूकीचा धाक दाखवत बाजूला केले. त्यांनी कान्हा ज्वेलर्स दुकानातील संपूर्ण सोन्याचा माल बँगेत भरून लूटून नेला. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले होते. दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन फरार झाले. या घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली मात्र या दरोड्याखोरांकडे बंदूक असल्याने त्यांनी बंदूकीचा धाक दाखवून नागरीकांना धमकावत तेथून पारनेरच्या दिशेने धुम ठोकली.
खडकवाडी फाटा ता. पारनेर येथील फुटेज
दरम्यान घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक रवाना केले असून उपविभागील पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी देखील दोन टिम या मार्गावर रवाना केले आहे. सदर चोरटे पारनेरच्या दिशेने गेल्याने पारनेर पोलीस देखील त्यांच्या मागावर आहे. दरम्यान दरोडेखोरांकडे बंदूक असल्याने त्यांची गाडी अडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना बंदूकीचा धाक दाखवून प्रसंगी हवेत गोळीबार करत ते प्रसार होत आहे. त्याचा हा संपूर्ण प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून लवकरच या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलीस उपाअधिक्षक कुणाल सोनवणे यांनी म्हंटले आहे.
साकूर बसस्थानक चौक