आमदार थोरात यांच्यावर राज्याची तर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर
प्रचारात गावोगावी नागरिक सक्रिय
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर महाविकास आघाडीच्या प्रचाराची राज्याची धुरा असताना संगमनेर तालुक्यातील गावागावांमध्ये तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक प्रचारात सक्रिय झाले असून आमदार थोरात यांच्या मोठ्या मताधिक्यासाठी संगमनेर तालुका एकवटला आहे.तळेगाव,निमोण,साकुर,धांदरफळ,संगमनेर खुर्द, घुलेवाडी,संगमनेर शहर या सर्व भागांमध्ये प्रत्येक गावांमधील नागरिक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाला आहे.काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातून नवव्या वेळेस निवडणूक लढवत असून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराची प्रमुख धुरा त्यांच्यावर आहे. काँग्रेस पक्षाकडून आमदार बाळासाहेब थोरात झंझावाती प्रचार दौरे करत असून महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण असून 180 जागा मिळतील व मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा असेल असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
तर संगमनेर तालुक्यामध्ये प्राचाराची धुरा गावोगावी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्रत्येक घरोघर जाऊन कार्यकर्ते प्रचार करत असून संगमनेर तालुका व संगमनेर शहर या प्रचारात पूर्णपणे एकवटले आहे. संगमनेर तालुका हा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असून जनतेचा मोठा उत्साह आणि तालुक्यातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संगमनेरची निवडणूक एकतर्फी होत आहे.संगमनेर तालुक्यामध्ये सुसंस्कृत आणि चांगले वातावरण असून निवडणूक नेहमी खेळीमेळीच्या वातावरणात होत असते. मोठ्या मताधिक्याचा विक्रम करण्यासाठी होत असलेल्या या लोकशाहीच्या महोत्सवात सर्वजण आनंदाने सहभागी झाले आहे.देवकौठे ते बोटा असा 110 किलोमीटर लांबीचा मोठा विस्तीर्ण मतदारसंघ असूनही प्रत्येक वाडीवस्तीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याचबरोबर संगमनेर शहरासाठी थेट पाईप लाईन सह हायटेक बस स्थानक व विविध वैभवशाली इमारती निर्माण केल्या आहेत.तसेच अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण करून दुष्काळग्रस्तांना पाणी दिले आहे. आगामी काळामध्ये पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी विविध योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजित केले असून सहकार, शिक्षण, शेती, दुग्ध व्यवसाय,ग्रामीण अर्थव्यवस्था फुललेली बाजारपेठ यामुळे वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरातून मोठ्या मताधिक्यासाठी तालुका सज्ज झाला आहे.
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक सक्रिय
युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात युवा संवाद यात्रा झाली. यामध्ये गावोगावी या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. याचबरोबर प्रत्येक गावातील युवक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने ही निवडणूक तरुणांनी हाती घेतल्याचे दिसत आहे.