आ. थोरातांच्या प्रचाराचाघराघरात झंझावात

शिर्डीत विखेंच्या डॅमेज कंट्रोलची व्यूहरचना?

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये नवव्यांदा आपली उमेदवारी करत असलेले बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार यंत्रणेने संगमनेर ग्रामिण भागाबरोबरच शहरी भागात सुध्दा नियोजनबध्द आपले काम करण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक प्रभागात व्यक्तिगत भेटीगाठींवर भर असून संध्याकाळी वार्डामध्ये छोटेखाणी सभांचे नियोजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले अमोल खताळ यांनी सुध्दा कार्यकर्त्यांबरोबर भेटीगाठीवर भर दिला आहे. परंतू खताळांची यंत्रणा विखेंची, सेनेची की भाजपाची असा संभ्रम काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे जाणवते. ऐनवेळी शिंदेसेनेची उमेदवारी स्वीकारून निवडणुक लढविणार्‍या खताळांना कट्टर शिवसैनिक व एकनिष्ठ भाजपा कार्यकर्ते किती साथ देतील अशी शंका व्यक्त होत आहे.

आ. थोरातांच्या प्रचारासाठी मा. आ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, हर्षल तांबे, शरयू देशमुख यांच्याबरोबरच गावागावातील कार्यकर्त्यांनी ही निवडणुक हातात घेतली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सक्रीय असणार्‍या जयश्री थोरात मात्र शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहेत. बाळासाहेब थोरातांनी राज्याची धूरा सांभाळित असताना संगमनेर एवढेच लक्ष शिर्डी मतदार संघात दिले आहे. गुरूवारी सायं. 7 वा. शिर्डी येथे प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब थोरात जाहिर सभा घेणार आहेत. शेजारील नेत्यांच्या आणि आपल्या यंत्रणेच्या मदतीने शिर्डी मतदार संघात विखेंना डॅमेज कंट्रोलची व्यूहरचना थोरातांनी राबविली आहे.
गुरूवारी दुपारी 3 वा. बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून माळीवाडा येथून सुरू होणार्‍या या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख