बंद स्थगित – मविआचा राज्यभर मूकमोर्चा

0
781

संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुख मोर्चा

बदलापूरसह राज्यात महिला-मुलींवर होणार्‍या अन्याय अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने आज राज्यभर मूकमोर्चा काढून राज्यसरकारचा निषेध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मुक मोर्चाचे नेतृत्व केले. संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुख मोर्चा काढण्यात आला. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये भरपावसात मुक मोर्चा पार पडला.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य व ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरात भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात हजारो नागरीक सहभागी झाले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आले. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली. तर शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील मुंबईत भरपावसात निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले.
बदलापूरसह राज्यभरात गेल्या काही दिवसात लहान मुली व महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहे. याचा निषेध करत महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारच्यावतीने कठोर उपाय योजनांची आठवण करून देण्यासाठी महाविकास आघाडीने आज राज्यभर मुक मोर्चा आयोजीत केला. संगमनेर येथे आ. बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुगाईताई तांबे, मिलिंद कानवडे, सोमेश्‍वर दिवटे, निखील पापडेजा, शिवसेनेचे अमर कतारी, कैलास वाकचौरे, अ‍ॅड. दिलीप साळगट, अशोक सातपुते, संजय फड, अप्पा केसेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, नागरीक काळ्या फिती लावून व काळे ध्वज दाखवत महायुती सरकारचा निषेध केला.

आंदोलन कर्त्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत राज्यसरकारच्या विरोधात मुक मोर्चातुन संताप व्यक्त केला आहे. यावेळी आ. बाळासाहेब थोरात यांनी बोलतांना सांगितले की, बदलापुर घटनेचा आम्ही निषेध करतो. सरकार आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करत होते. मात्र नागरीकांनी व विरोधी पक्षांनी आवाज उठविल्यानंतर सरकारने कारवाईला सुरूवात केली. गुन्हा दाखल करण्यास झालेला उशिर आरोपींना पाठीशी घालण्याचा केलेला प्रयत्न यामुळे नागरीकांचा संताप वाढला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला ठिकाणावर आण्ण्यासाठी व या गंबीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. मात्र गांभीर्य नसलेले सरकार उलट विरोधकांवरच आरोप करत आहे. महाविकास आघाडीने राज्यभर काढलेल्या या मुकमोर्चाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचेही आ. थोरात म्हणाले. विरोधी पक्षांनी आवाज उठविल्यानंतर सरकारने आज मुंबई आणि ठाणे येथील दोन वरिष्ठ शिक्षण अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here