संगमनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. किसन भाऊ हासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे सन २०२४_२५ या शैक्षणिक वर्षात येणारा भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात पोदार इंटरनॅशनल स्कूल संगमनेर मध्ये साजरा करण्यात आला.
संगमनेर मधील प्रतिथयश दैनिक वृत्तपत्र युवा वार्ता तसेच संगमनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. किसन भाऊ हासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आकाशात उंच फडकणार्या ध्वजाकडे पाहत राष्ट्रगीत आणि नंतर देशभक्तीपर गीत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती मिनाक्षी मिश्रा यांनी आलेल्या मान्यवर व्यक्तीं चे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता नुसार प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य विष्काराने शाळेचा परिसर भारत माता की जय घोषणा ने दणाणून गेला. यानंतर इयत्ता पहिली आणि दुसरी च्या विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेषभूषा परिधान करून या स्वातंत्र्य सेनानी ना आदरांजली वाहताना उत्कृष्ट परेड चे सादरीकरण केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने सर्वाना भारावून टाकले.
यानंतर प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात विविध गोष्टींचा दाखला देत मिळालेले स्वातंत्र्य जपण्याची जवाबदारी सर्व भारतीय लोकांची विशेष म्हणजे उदयोन्मुख तरूण पिढी ची असून आज जगात भारत एक विकसित देश म्हणून प्रसिद्ध होतांना आपले सार्वभौमत्व जपणे हे आपले कर्तव्य आहे हे सांगितले.
शाळेच्या प्राचार्या श्रीमती मिनाक्षी मिश्रा मुलांना मार्ग दर्शन करताना म्हणाल्या की आपल्याला मिळाले ल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा आणि भारतीय असल्याचा स्वाभिमान बाळगावा असे सांगितले.
शेवटी आभार मानतांना या नयनरम्य कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने झाली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांनी कु. पौरस दातरंगे आणि कु. अनुष्का लाड यांनी केले.या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या,विद्यार्थी, कार्यक्रमाचे समन्वयक, संयोजक, शाळा समन्वयक , पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.