संगमनेर रोटरी क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित

0
1017

अध्यक्ष आनंद हासे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी पाचगणी येथे पार पडलेल्या डिस्ट्रीक्ट 3132 च्या शानदार पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ संगमनेरला विविध सामाजिक कामांसाठी 9 पुरस्कार प्रदान करण्यात आले. डिस्ट्रीक्ट 3132 अंतर्गत येणार्‍या 11 जिल्ह्यांमधील 110 क्लबमधून ठराविक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या क्लबना हे पुरस्कार वितरीत केले जातात. सन 2023-24 वर्षांसाठी हे पुरस्कार वितरीत करण्यात आले.
क्लबचे तत्कालिन अध्यक्ष आनंद हासे यांनी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवून दिलेल्या विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये वर्षभर नेत्रदिपक कामगिरी केली. त्या कामगिरीची नोंद ठेवत हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. बेस्ट टेक्नोसॅव्ही क्लब, मेंबरशीप डेव्हलपमेंट गोल्डन, मेंबरशीप डेव्हलपमेंट सिल्व्हर, दी रोटरी फाऊंडेशन डोनेशन, झाडांचे संगोपन, डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधीत केलेली कामे, ग्राम परिवर्तन प्रकल्प अशा क्षेत्रांमधील कामांसाठी हे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सेक्रेटरी मधुसुदन करवा, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार अमित पवार व सर्व रोटरी सदस्यांचे योगदान लाभले. हे पुरस्कार स्विकारण्यासाठी अध्यक्ष आनंद हासे, दिपक मणियार, अजित काकडे, मोहित मंडलिक, महेश ढोले आदि उपस्थित होते.


रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सन्मान क्लबला मिळाला. हा आनंदाचा क्षण ढोल ताशे वाजवून तसेच फटाकांच्या आतषबाजी करुन साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सदस्य दिलीप मालपाणी, रोटरी आय केअरचे अध्यक्ष सीए संजय राठी, दिपक मणियार, अजित काकडे, नूतन अध्यक्ष साईनाथ साबळे, योगेश गाडे, संदीप फटांगरे, ऋषीकेश मोंढे, डॉ. विकास करंजेकर, ओंकार सोमाणी, पवनकुमार वर्मा, महेश ढोले, खजिनदार विकास लावरे, डॉ. रमेशजी पावसे आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here