सौरभ म्हाळस यांना पितृशोक
युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)
डॉ. देवेंद्र ओहरा मूकबधिर विद्यालय व संग्राम मतीमंद विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक कविवर्य सुरेश लक्ष्मीकांत म्हाळस यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने आज सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. गिर्यारोहक, सर्पमित्र आणि पर्यटन व्यवसायात नाव असणारे सौरभ म्हाळस यांचे ते वडिल होते.
कै. सुरेश म्हाळस सर कवी मनाचे आणि दिलखुलास असे व्यक्तीमत्व होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव असे काम केले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य कला क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने मोठा मित्र परिवार होता. त्यांच्यावर आज सोमवारी सकाळी येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. सुरेश म्हाळस सर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.