स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत संगमनेर बसस्थानक विभागात अव्वल

0
965
अर्धवट दुभाजक कारचा

पाच लाखांचे बक्षिस जाहीर

संगमनेरच्या हायटेक बसस्थानकाला स्वच्छतेत नाशिक विभागात अव्वल क्रमांक मिळाला. तसेच पाच लाखांचे बक्षिस मिळाले. याबद्दल संगमनेर आगाराचे अभिनंदन मात्र संगमनेर बसस्तानकात स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रवाश्यांची सुरक्षितता, प्रसाधन गृहातील स्वच्छता, पार्कींगची असुविधा, मोकाट जनावरांचा वावर यासह अनेक प्रश्‍न आजही जसेच्या तसे आहेत. भिकार्‍यांनी व चोरट्यांनी हे बसस्थानक व्यापले आहे. येथील स्वच्छता व दुरावस्था बाबत अनेकवेळा प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे. बसस्थानकाच्या आतमध्ये जरी स्वच्छता दिसत असली तरी आजूबाजुला, प्रवेशद्वारासमोर असणारे अतिक्रमण, अस्वच्छता नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. बसस्थानकाला मोठे बक्षिस व मान मिळाला. मात्र आता या समस्येकडे गांभीर्याने पहावे अशी अपेक्षा प्रवाशी व्यक्त करत आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेरच्या वैभवात भर घालणार्‍या व हायटेक बसस्थानक म्हणून लौकिक मिळवलेल्या संगमनेरच्या बसस्थानकाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्वच्छता अभियानामध्ये नाशिक प्रादेशिक विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये स्वच्छतेचे निकष पूर्ण करत संगमनेर बसस्थानकाने ’अ-वर्ग’ बसस्थानकामध्ये नाशिक प्रादेशिक विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. याचबरोबर ’ब-वर्ग’ बसस्थानकामध्ये याच विभागातून लोणी बसस्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला असून, अडीच लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. याबद्दल संगमनेरचे आगारप्रमुख प्रशांत गुंड, अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रातील 250 बसस्थानकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अ. वर्गाला 50, ब. वर्गाला 25, तर क. वर्गाला 10 लाखांचे असे विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. एप्रिल 23 ते मार्च 24 या दरम्यान चार सर्वेक्षण झाले होते, त्यामध्ये संगमनेर बसस्थानक हे अ. वर्गात असल्याने बसस्थानकाला 100 पैकी 79 गुण मिळाले
त्यामुळे नगर विभागात प्रथम, तर नाशिक प्रादेशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सुमारे पाच लाखांचे बक्षीस मिळाले आहे, तसेच संगमनेर आगार अंतर्गत असलेल्या लोणी बसस्थानकालाही अडीच लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मुंबई येथे 15 ऑगस्टला मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण होणार आहे, अशी माहिती संगमनेरचे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली आह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here