पावसात तळे आणि पावसानंतर खड्डे

0
1006

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची नागरीकांची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर शहरात काहीसा जोराचा पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी मोठ-मोठे तळे साचते त्याच बरोबर या पावसामुळे अनेक रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या सखल भागात पाणी जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी नेहमीच मोठे तळे साचते. त्यामुळे पादचारी, वाहनचालक तसेच येथील व्यावसायीक यांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तर पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणी मोठे- खड्डे उघडे पडलेले दिसत आहे. आज सोमवारी पालीकेच्यावतीने या खड्ड्यांवर खडी टाकून तात्पुरते डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणीची समस्या अनेक वर्षांची असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here