अज्ञात वाहनाच्याधडकेत महिला ठार

0
1204

नाशिक -पुणे महामार्ग कासारवाडी शिवारात घडला अपघात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
शहरातील नगरपालिकेच्या आवारातील एका रुग्णालयात आपल्या सासूची देखभाल करण्यासाठी आलेल्या महिलेला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शनिवारी ता. 15 रोजी रात्री उशिरा नाशिक पुणे महामार्ग कासारवाडी शिवारात घडली.
रंजना भिकाजी खेमनर वय 35 रा. अंभोरे असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मयत महिला रंजना खेमनर यांच्या सासूच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तीच्या देखभालीसाठी सूनबाई रंजना या तिच्या जवळ होती. दरम्यान शनिवारी रात्री मयत सून हॉस्पिटल व सासूला सोडून नाशिक पुणे महामार्गावर अकोले रोडच्या दिशेने गेली होती. बराच वेळ झाला तरी सदर महिला हॉस्पिटलमध्ये परत आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केला असता शहर पोलिसांकडून त्यांना या अपघाताची व त्यात मरण पावलेल्या महिलेची माहिती मिळाली. त्यानंतर मृतदेह पाहिल्यावर हा मृतदेह रंजना खेमनर यांचा असल्याचे आढळून आले. या महिलेला अज्ञात वाहन धडक देऊन निघून गेले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मच्छिंद्र किसन तोरे रा. कोळपेवाडी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा रजी. नं. 527/2024 भादवी 304 अ, 279, 337, 338, मोवाका 184, 134 अ, ब, प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोउनि रमेश पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here