कपिल चांडक, सौरभ आसावा, आदित्य राठी, महेश मयूर, वेणूगोपाल लाहोटी आयर्न मॅन
युवावार्ता (प्रतिनिधी) – कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बर्गमॅन 113- 70.3 आयर्न मॅन स्पर्धेत संगमनेर येथील उद्योजक कपिल चांडक, सौरभ आसावा, आदित्य राठी, महेश मयूर, वेणूगोपाल लाहोटी यांनी हाल्फ आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करीत संगमनेरचे नाव नेहमीप्रमाणेच उंचावले आहे. 1.9 किलोमीटर स्विमींग, 90 किलोमीटर सायकलिंग, 21.1 किलोमीटर रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध राजाराम तलाव येथे स्विमींग, हायवेवर सायकलिंग आणि कोल्हापूरमधील अंतर्गत रस्त्यांवर रनिंग असे आयोजन डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले होते.
कपिल चांडक यांनी स्विमींग 57 मिनिटात पूर्ण केली. सायकलिंग करीत असताना चांडक यांचे टायर पंक्चर झाले. 30 मिनिटांमध्ये पंक्चर काढून पुन्हा स्पर्धेत उतरलेल्या चांडक यांनी 4 तास 2 मिनिटात सायकलिंग पूर्ण केली. रनिंगसाठी त्यांना 2 तास 55 मिनिटे लागली. एकूण 8 तास 9 मिनिटांमध्ये त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. तिसऱ्यांदा आयर्न मॅन पूर्ण केलेल्या चांडक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सौरभ आसावा यांनी एकूण 8 तास 2 मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. त्यांना स्विमिंगसाठी 59 मिनिटं, सायकलिंगसाठी 3 तास 47 मिनिटं, रनिंगसाठी 2 तास 56 मिनिटं लागली. सौरभ आसावा यांनीसुद्धा तिसऱ्यांदा हाल्फ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.
आदित्य राठी यांनी 6 तास 45 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. स्विमिंगसाठी 43 मिनिटे, सायकलिंगसाठी 3 तास 16 मिनिटे तर रनिंगसाठी 2 तास 32 मिनिटे लागली. सीए आदित्य राठी यांनी दुसऱ्यांदा आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.
पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी घेतलेल्या उद्योजक महेश मयूर यांनी 8 तास 30 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. स्विमिंगसाठी 1 तास 14 मिनिटे, सायकलिंगसाठी 3 तास 46 मिनिटे तर रनिंगसाठी 3 तास 5 मिनिटांचा वेळ महेश मयूर यांना लागला. मध्यंतरी मयूर यांचा अपघात झाला होता. मणक्याच्या त्रास असतानाही त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जोरदार प्रॅक्टिस केली. पहिल्याच प्रयत्नात आयर्न मॅन झालेल्या महेश मयूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेणूगोपाल लाहोटी यांनी ही स्पर्धा 7 तास 15 मिनिटात पूर्ण केली. स्विमिंगसाठी 51 मिनिटे, सायकलिंगसाठी 3 तास 17 मिनिटे तर रनिंगसाठी त्यांना 2 तास 53 मिनिटे लागली. दुसऱ्यांदा त्यांनी आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवले आहे.
शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर कस लागणाऱ्या या स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐