ट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू

0
1404

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नवीन अकोले रोडवरील इदगाह मैदानाच्या कोपर्‍याजवळील चौफुलीवर एका मालट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात आज गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खांडगाव येथील एक तरुण आपल्या दुचाकीवरून नवीन अकोले रोडवरून जात होता. यावेळी माल ट्रक क्रमांक एम एच 42 ए 9242 हा ट्रक अकोलेच्या दिशेने जात होता.

या ठिकाणी चौफुली असून रस्त्याच्या कडेला भाजीपाला बाजार भरतो. त्यामुळे नेहमीच गर्दी असते. वाहतूक संथ आणि जाम देखील असते. दरम्यान मोठा ट्रक आणि शेजारी दुचाकीस्वार यांना एकमेकांच्या वाहनांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली सापडला. यात युवकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. पोलिस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयत तरूणांला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर मयत तरुणांच्या गाडीत आधार कार्ड सापडले असून त्यावर ओम गणेश गुंजाळ (रा. खांडगाव) असे नाव आहे.

ओम गणेश गुंजाळ राहणार खांडगाव या मुलाचा एक्सीडेंट झालेला आहे आत्तापर्यंत सात ते आठ एक्सीडेंट झालेत या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवणे अतिशय गरजेचे आहे कारण चौक असल्याने अकोले बायपासचे लोक अतिशय वेगाने निघतात भरधावं गाडी 100च्या स्पीडने टर्न मारते म्हणून या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवणे गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here