तांत्रिक प्रावीण्य, काटेकोर नियोजन आणि परिणामकारक प्रशासनाचे आदर्श उदाहरण

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने दिल्या जाणारा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्काराने श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणेचे कार्यकारी संचालक भास्कराव घुले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल भास्करराव घुले यांचे पुणे, अकोले, संगमनेर तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने चांगली कामगिरी करणार्या सहकारी साखर कारखान्यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षी देखील या संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दोन टप्यात विस्तारीकरण पूर्ण केले. गाळप आणि तांत्रिक क्षमतेते कारखाना अव्वल स्थानावर गेला आहे. गाळप करतांना साखरेचा कमीत कमी अपव्यय, बगॅस बचत, स्टीमचा कमीत कमी वापर, साखरेचा दर्जा याबाबतीत कारखान्याने आघाडी घेतली. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार बारामतीतील सोमेश्वरनगर (पुणे) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वैयक्तिक पुरस्कार- (रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र), सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक (विभागून) – शहाजी गायकवाड – दोंड शुगर, पुणे व भास्कर घुले – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे, सर्वोत्कृष्ट चीफ इंजिनिअर अशोक मुटकुळे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.





















