नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या 350 कोटींच्या प्रस्तावास मान्यता द्यावी – आ. तांबे

0
66

युवावार्ता (प्रतिनिधी)
नाशिक – प्रयागराजमुळे 2026-2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किमान पाचपट अधिक भाविक येण्याचा अंदाज असल्याने 1200 एकर जागेवर नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये साधुग्राम उभारले जाणार आहे. प्रयागराजपेक्षा तिपटीने अधिक 25 हजार कोटी रुपयांचा निधी पायाभूत सुविधा तसेच नियोजनासाठी दिला जाणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ( 13 नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयांच्या कामांचे येथे भूमिपूजन केले.
फडणवीस म्हणाले की, प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 15 हजार हेक्टर जागा होती. मात्र नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये पाचशे एकर जागा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह प्रमुख आमदार उपस्थित होते.

प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. कुंभमेळ्याच्या वेळी हजारो-लाखो भाविक संगमनेरला येतात. प्रवरा नदीवर स्नान करतात. संगमनेरमधील असंख्य नागरिक सुध्दा आपल्या नेहमीच्या धावपळीत वेळ काढून प्रवरा नदीमध्ये डुंबण्यासाठी जात असतात. नदी सुधार प्रकल्पाच्या अनुशंगाने आम्ही 350 कोटी रूपयांचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्राधिकरणाचे काम नाशिक येथे कुंभमेळा आहे म्हणून तेथेच चालणार असेल तर आजूबाजूंच्या गावामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोई-सुविधांचे काय? फक्त नाशिकचा विचार न करता संगमनेरचा विचारही प्राधान्याने केला पाहिजे. नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या गावांमधील पायाभूत सुविधांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यालादेखील कुंभमेळ्याच्या माध्यमातून चालना दिली पाहिजे. मैसूर किंवा दक्षिण भारतातून जे साधू कुंभमेळ्यासाठी येतात ते संगमनेरमार्गे येतात. येथे मुक्काम करतात. प्रवरा नदीवर पूजापाठ करून स्नान करतात. संगमनेरमध्ये मैसूरच्या राजाची पालखी येते. ते प्रवराकाठी थांबतात. अनेक वेळा तर आम्हाला त्यांची चांगली सोय करता येत नाही. त्यामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरचाही समावेश करून लवकरात लवकर 350 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.


75 वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आल्याने 28 महिने कुंभपर्व चालेल. श्रीरामांच्या वास्तव्याच्या खुणा जपणारी रामकालपथ महत्त्वाकांक्षी योजना आहे. श्रीरामांनी वनवासात प्रवास केलेल्या मार्गांना पुनरुज्जीवित करणे, त्यांचे जतन करणे आणि भाविकांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणे योजनेचा उद्देश आहे. सर्व कामे वेळेत व पारदर्शी होणार असून पुढील 25 वर्षे ती टिकली पाहिजे असे नियोजन सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बाह्य व अंतर्गत रिंगरोड, गोदावरी घाट, विमानतळावरील धावपट्टी व पायाभूत सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा उल्लेख करताना एक आधुनिक नाशिक शहर उभे राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाविकांसाठी ‘कुंभ सहाय’ चॅटबॉट (11 भाषांत) व प्रयागराज विमानतळ टर्मिनलचे विस्तारीकरण.
1.5 लाख पेक्षा जास्त बायो-शौचालये आणि स्वयंचलित कचरा व्यवस्थापन युनिट्सवर भर. 12 किलोमीटर लांबीचे स्नान घाट, अक्षयवट आणि हनुमान मंदिर कॉरिडॉरचा विकास, 30 पोन्टून पूल आणि 450 किलोमीटर लांबीच्या मेळा क्षेत्रातील रस्त्यांची निर्मिती. एआय आधारित गर्दी नियंत्रण, चेहरा ओळख व ड्रोनद्वारे हवाई पाळत. कुंभमेळा प्राधिकरण कायदा लागू करण्याची योजना, तसेच 300 एकरवर साधुग्राम विकास. गोदावरी शुद्धीकरण : नवीन पाणी शुद्धीकरण आणि मोठे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (400 एमएलडी). रामकुंड ते काळाराम मंदिरपर्यंतचा ‘रामकाल पथ’ वारसा विकास व त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसर विकास. शहराची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नाशिक रिंग रोड बांधणी आणि गोदावरीवर नवीन 6 ते 11 पूल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here