मालपाणी स्मृती मॅरेथॉनमधून आरोग्यसंस्कारांची नवी चळवळ

0
5

दोन हजार धावपटूंचा सहभाग; अबालवृद्धांनी घेतला धावण्याचा आनंद

संगमनेर – मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू उद्योगपती स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब संगमनेर सफायरने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमनेर मधील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील सुमारे दोन हजार धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून इतिहास घडविला. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद संगमनेरकरांमधील आरोग्यविषयक जागृकता दर्शवणारा असल्याची प्रतिक्रिया क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी यावेळी बोलताना दिली.

नियमित चालणे, धावणे इत्यादी व्यायाम निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस स्वतःसाठी देऊन धावण्याच्या व्यायाममधून चांगल्या सवयी शरीराला लागाव्यात. निरोगी आयुष्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. असा संदेश देण्यात आम्ही यशस्वी झालो याचे मोठे समाधान असल्याची भावना यावेळी गिरीश मालपाणी यांनी व्यक्त केली. लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या स्पर्धेत सात किलोमीटर व दहा किलोमीटर अशा दोन प्रकारच्या स्पर्धेचा समावेश होता. श्री.अग्रवाल यांनी सातत्यपूर्ण आणि भव्य आयोजनाबद्दल लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन-सफायरची प्रशंसा केली. प्रत्येक ‘रनर’ हा ‘विनर’ आहे अशी मध्यवर्ती संकल्पना असल्याने स्पर्धा पूर्ण करणार्या सर्वांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी मालपाणी उद्योग समूह, स्वदेश उद्योग समूह, समता पतसंस्था यांचे सहकार्य लाभले.


क्लबचे अध्यक्ष कल्याण कासट, सचिव सुमीत मणियार आणि खजिनदार नामदेव मुळे, प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी, कृष्णा आसावा, अतुल अभंग, चैतन्य काळे, अक्षय गोरले, कल्पेश मर्दा, गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिवंसरा, महेश डंग, डॉ.अमोल पाठक, राजेश रा. मालपाणी, अजित भोत, उमेश कासट, सीए प्रशांत रुणवाल, देविदास गोरे, धनंजय धुमाळ, जितेंद्र पाटील, विशाल थोरात, हरमीतसिंग डंग, संदीप गुंजाळ, संतोष अभंग, रोहित मणियार, हरज्योतसिंग बत्रा, शुभम तवरेज, अनन्या धुमाळ, डॉ.मधुरा पाठक, मंजुषा भोत, नम्रता अभंग, प्रीती काळे, प्रियंका कासट, वंदना मणियार, मीनल अभंग, अंजली पाटील, चैताली जोर्वेकर, पायल शहा इत्यादींचा समावेश असलेल्या प्रकल्प समिती स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here