इंदिरानगर येथे दोन गटात तुफान राडा, तलवारीसह घातक शस्त्राचा वापर

0
371

संगमनेर (प्रतिनिधी)-
शहरातील इंदिरानगर येथील एका गल्लीत भाडेकरू म्हणून राहत असलेल्या महिलेने घराचा दरवाजा तोडला, भाडे सुध्दा वेळेवर दिले नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या पत्नीला या भाडेकरू महिलेने शिवीगाळ केली. त्यानंतर हा वाद पेटून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात थेट तलवारी सह वीटा दगडांचा देखील मुक्त हस्ते वापर करण्यात आला. यात काही जण जखमी देखील झाले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात
सात जणांसह इतर अनोळखी पाच ते सहा जणांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान दि.01/07/2025 रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास घरमालक फिर्यादी या इंदिरानगर येथील घरी जावुन घरात भाडे तत्वावर राहत असलेली पल्लवी सागर गंगावणे हिला समजावून सांगितले की, तुम्ही फक्त दोन महिन्यासाठी भाडेने रुम घेतला होता. परंतु आता चार महिने होवुन गेले असुन तुम्ही घर खाली केलेला नाही. फक्त 01 महिन्याचे घरभाडे दिलेले आहे. असे म्हणाल्याचा भाडेकरू महिलेला राग आल्याने, तुम्ही जास्त बोलले तर तुमच्यावर जातीवरुन शिव्या दिल्याबद्दल खोटा गुन्हा दाखल करेल अशी पुन्हा धमकी देवुन ती इंदिरानगर येथील गल्लीत पळत गेली व सोबत 10 ते 12 मुले घेवुन आली. त्यापैकी काही मुलांचे हातात गलुल होती.

शुभम चंद्रकांत जाधव याचे हातात तलवार होती, त्याने घरमालक महिलेच्या मानेवर त्याचे हातात असलेली तलवार ठेवुन, हात धरुन, लज्जा उत्पन्न होईल आशा रितीने त्याच्याकडे ओढले. तसेच शिवीगाळ करून तु जर येथे परत आली तर तुझ्यावर तुझा खुन करुन टाकेल अशी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अथर्व दुर्गेश रासणे व वैराळ यांनी त्यांचे हातात असलेले विटा फेकूण मारले. सनी तरटे, अंगद उर्फ प्रेम परदेशी व प्रथमेश पावडे यांनी देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली. असे या फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून शहर पोलिसांनी 1) शुभम चंद्रकांत जाधव, 2) अथर्व दुर्गेश रासणे, 3) वैराळ, 4) सनी तरटे, 5) अंगद उर्फ प्रेम परदेशी, 6) प्रथमेश पावडे 7) पल्लवी सागर गंगावणे रा. इंदिरानगर ता संगमनेर व इतर अनोळखी 05-06 लोकांविरुद्ध विरुद्ध अनेक कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलीसांना या घटनेची माहिती समतजात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी धाव घेत मध्यस्थी केली. तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनाला धारेवर धरत प्रश्‍नांचा भडीमार केला. त्यातून नविनच वाद निर्माण झाले. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर पोलीसांनी या हाणामारीवर आणि वादावर काबू मिळवला. या प्रकरणी दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. मंगळवारी रात्री या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here