शिर्डीला येणाऱ्या भक्तांसाठी आता साईकवच, साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय

0
2439

संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक

दैनिक युवावार्ता- शिर्डी: शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेनं आज गुढी पाडव्याच्या शुभमुहर्तावर साईभक्तांसाठी महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगाने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश विदेशात विखुरलेले आहेत. वर्षाकाठी येथे साधारण साडे तीन कोटी भाविक साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. मात्र बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना काही दुर्घटना घडत असतात. याच अनुषंगाने साई संस्थानने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात भाविकांना अपघाती पाच लाख रुपयांच सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची माहीती साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

संस्थान संकेत स्थळावर नोंद करणे बंधनकारक…

साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याआधी साई संस्थानच्या अधिकृत संकेत स्थळ www.sai.org.in यावर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. यामुळे घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करे पर्यंत काही अघटित घटना घडली, तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे.

शिर्डीत साई दर्शनासाठी आलेला भाविक बाबांना आपल्या यथाशक्तीनं दान टाकतो. एक रुपया पासून ते शंभर कोटी रुपयांच महादान देणारा साईंचा भाविक आहे. सर्वधर्मसमभावच ठिकाण असल्यान येथे जात पात, धर्म याच बंधन नाही. त्यामुळे दिवसाला सरासरी एक कोटी रुपयांचा दान साईंना प्राप्त होत. याच दानातून आता वर्षाकाठी 48 लाख रुपये साईसंस्थान खर्च करणार असून भाविकांना हे विमा कवच प्रदान करणार आहे. मागील काही आकडेवारीनुसार वर्षभरात साधारण दहा लाख भाविकांनी साईसंस्थानच्या संकेत स्थळाला भेट दिलीये यानुसार ह्या विमा कवचचा लाभ प्राथमिक आधारे साधारण दहा भाविकांना मिळू शकेल. यात भाविकांची संख्या देखिल वाढणार असून यांची तजवीज देखिल संस्थानने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here