सॅफ्रॉन सफायर आयडॉल २०२६ उत्साहात

0
1

सुरेल सादरीकरणाने रंगली अविस्मरणीय मैफल

संगमनेर : लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सॅफ्रॉन सफायर आयडॉल 2026 ही राज्यस्तरीय गायन स्पर्धा 28 व 29 जानेवारी रोजी मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या सुरेल आवाजाने रसिकांची मने जिंकली. रम्य सायंकाळी सूरांची मैफिल अशी रंगली की उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट लाभत होता आणि संपूर्ण परिसर संगीताच्या लहरींनी भारावून गेला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णाताई मालपाणी यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण प्रसिद्ध उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या हस्ते संपन्न झाले. युनिकॉल अडेसिव्ह आणि मालपाणी ग्रुप यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतले होते.
गट क्रमांक 01 (तिसरी ते सहावी) मध्ये बालगायकांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. या गटात गार्गी रासने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्वानंदी जयदीप पडवळ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर श्राव्या योगेश शहाणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. हसनीन पठाण आणि आरोही सागर श्रीमंदिलकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. स्वरा विजय जाधव यांना प्रथम उत्तेजनार्थ तर वेदा चैतन्य काळे यांना द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.


गट क्रमांक 02 (सातवी ते दहावी) मध्येही चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. या गटात राजश्री भाऊसाहेब गाडाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला. श्रावणी संतोष कणोजे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर तेजस्वी दीपक क्षीरसागर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. समीक्षा गौतम साळवे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. जिया इमामम शेख आणि श्रवण शैलेश मुंदडा यांना प्रथम उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर दुर्वा महादू मुंढे, साक्षी रामजीलाल सैनी यांना द्वितीय उत्तेजणार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गट क्रमांक 03 (युगल – खुला गट) या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गटाने विशेष आकर्षण ठरवले. या गटातील स्पर्धकांनी सादर केलेल्या युगल गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या गटात प्रथम क्रमांक प्रणीत उमप-गार्गी राऊत यांनी मिळविला. अक्षता व जयदीप पडवळ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. उन्नती तवाणी व ऋषभ म्हसे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मोनिका मेने व राहिल सय्यद यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. डॉ. शैलेंद्र गायकवाड व स्नेहल हिरे यांना प्रथम उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सुनिल टकले व आश्विनी टकले यांना द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गट क्रमांक 04 (महाविद्यालयीन गट) मध्ये आर्य सचिन लवलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिक संजय सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक, अक्षता जयदीप पडवळ यांनी तृतीय क्रमांक तर आयुष अजित भोत यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. ओंकार गोरक्षनाथ नालकर यांना प्रथम उत्तेजनार्थ तर नम्रता गोरख हांडे यांना द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गट क्रमांक 05 (खुला गट) मध्ये अनुभवी तसेच नवोदित गायकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अंबादास बापूराव बुलाखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रियांका प्रतीक पोफळे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. प्रणव मुकुंद सोमाणी यांनी तृतीय क्रमांक तर किरण एल. चिंचे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. डॉ. शैलेश गायकवाड आणि अंजली अनिल गोरले यांना प्रथम उत्तेजनार्थ तर सचिन देशमुख व किरण गायकवाड यांना द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मालपाणी, जितेंद्र पाटील, नम्रता अभंग व सोनल गोरले यांनी ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीनिवास भंडारी, डॉ. जितेंद्र पाटील, उमेश कासट, अतुल अभंग, प्रकल्प समिती तसेच लायन्स सॅफ्रॉन सफायरचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

सॅफ्रॉन सफायर आयडॉल 2026 ही स्पर्धा केवळ गायन स्पर्धा न ठरता एक सुरेल सांस्कृतिक सोहळा ठरली. स्थानिक तसेच राज्यभरातील प्रतिभावान गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत ही स्पर्धा भविष्यातील गुणी कलाकार घडविण्याचा सेतू ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here