रमेश गुंजाळ यांची राजहंस दूध संघाच्या संचालकपदी निवड

0
23

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील राज्यात अग्रगण्य असणार्‍या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकपदी खांडगाव येथील युवक कार्यकर्ते रमेश लहान भाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाचे रिक्त असलेल्या जागी रमेश लहान भाऊ गुंजाळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख,व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, विलासराव वर्पे, संतोष मांडेकर,विलास कवडे, विक्रम थोरात, भारत शेठ मुंगसे, विष्णू ढोले, संजय पोकळे,आर.बी.राहणे,भास्करराव सिनारे,बादशहा वाळुंज, बबन कुर्‍हाडे, तुकाराम दातीर,रवींद्र रोहम,डॉ.प्रमोद पावसे,प्रतिभा जोंधळे,मंदा नवले,कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

खांडगाव ग्रामस्थांच्यावतीने गुंजाळ यांचा सत्कार

सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे आणि खांडगाव परिसराच्या विकासात योगदान देणारे रमेश गुंजाळ यांची राजहंस दुध संघाच्या संचालक पदावर निवड झाली. हे वृत्त समजताच खांडगाव ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने रमेश गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीचा खांडगाव ग्रामस्थांना सार्थ अभिमान असल्याचे सांगून रमेश गुंजाळ यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते लहानभाऊ गुंजाळ, अ‍ॅड. मधूकर गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


रमेश गुंजाळ हे माजीमंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने युवक संघटनेचे काम करत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी दहा वर्ष यशस्वीपणे काम केले आहे. मोठा जनसंपर्क, विनम्र स्वभाव याचबरोबर प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी तालुक्यामध्ये मोठा लौकिक मिळवला आहे. त्यांची राजहंस दूध संघाच्या संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना मा. मंत्री थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून त्यामधून शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. दूध हा तालुक्याचा मुख्य व्यवसाय झाला आहे. दूध व ऊस हे शाश्‍वत उत्पन्न असून संगमनेर तालुका दूध संघाने सातत्याने शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. दुग्ध वाढीसाठी विविध योजना राबवले असून सर्व संचालक मंडळ कार्यक्षमपणे काम करत असून रमेश गुंजाळ हे तरुण उत्साही कार्यकर्ते असून त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्की होईल असे ते म्हणाले.
तर रमेश गुंजाळ म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कायम एकनिष्ठतेने समाज विकासाचे काम केले असून यापुढील काळात राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध वाढ व सहकारातून शेतकरी व गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने काम करू असे ते म्हणाले.रमेश गुंजाळ यांच्या या निवडीबद्दल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे, सोमेश्‍वर दिवटे, रणजितसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लहानभाऊ गुंजाळ, आर. बी. रहाणे, पांडुरंग पाटील घुले, शंकरराव पा. खेमनर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकार्‍यांनी व तरुण कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here