स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगष्ट)”रायबा, हेच का आपले स्वराज्य..!” या तडाखेबंद महानाट्याचे आयोजन

0
451

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत लायन्स सॅफ्रॉनचे सदस्य डॉ. सागर फापाळे तर संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांचे

संगमनेर (प्रतिनिधी) – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये या वर्षी “रायबा, हेच का आपले स्वराज्य..!” या तडाखेबंद भव्य महानाट्याचे आयोजन मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे गुरूवार दि. १४ ऑगष्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वा. करण्यात आल्याचे प्रकल्प प्रमुख आणि लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रशांत गुंजाळ आणि सुदीप हासे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे.

प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी यांनी सांगितले की, गेल्या २१ वर्षांपासून संगमनेर सॅफ्रॉन सफायर स्वातंत्र्योत्सव उपक्रम राबवित असून मनींदरजितसिंग बिट्टा, आफळे महाराज, राहुल सोलापूरकर, डॉ. संजय मालपाणी आदी वक्त्यांनी आपली व्याख्याने दिली आहेत. सामुहिक नृत्य स्पर्धा, व्याख्याने, नाटक हे या स्वातंत्र्योत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी जोश द डान्स शो यामध्ये संगमरनेरकरांनी अलोट गर्दी केली होती.

लायन्स सॅफ्रॉनचे अध्यक्ष अड कल्याण कासट, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे हे कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेत असून प्रकल्प समितीमध्ये अतुल अभंग, धनंजय धुमाळ, रोहित मणियार, नितीन हासे, जितेंद्र पाटील, जितेश लोढा, डॉ. सागर फापाळे, श्रीहरी पिंगळे, संतोष अभंग, डॉ. अनिरूध्द डिग्रसकर, शैलेंद्र गाडेकर, विनायक भोईर, सचिन गाडे, विशाल थोरात, कृष्णा आसावा, प्रणित मणियार, अक्षय गोरले, शिरीष गांधी, आदित्य कडलग, नम्रता अभंग, चैताली जोर्वेकर, मिनल अभंग, सोनल गोरले कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here