NIMA Women’s Forum च्या माध्यमातून ग्रामीण मातृत्वासाठी नव्या अभियानाची सुरुवात

एकता वाबळे: माॅमेबलचे ‘मिशन एकता’ : NIMA Women’s Forum च्या माध्यमातून ग्रामीण मातृत्वासाठी नव्या अभियानाची सुरुवात
संगमनेर (प्रतिनिधी) : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) Women’s Forum यांच्या सहकार्याने Momable Fertility Center तर्फे नुकतेच वैद्यकीय सतत शिक्षण शिबिर (CME) आयोजित करण्यात आले. या विशेष उपक्रमात “कुटुंब वैद्यांचा वंध्यत्व उपचारात सहभाग” या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या CME मध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. एकता वाबळे व डॉ. जगदीश यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमात उपस्थित NIMA Women’s Forum च्या वरिष्ठ डॉक्टरांच्या हस्ते Momable चा माहितीपर ब्रोशर प्रकाशित करण्यात आला. त्याच वेळी Momable ने सामाजिक भान जपणारा नवा उपक्रम सुरू केला – ‘मिशन एकता’.
मिशन एकता : ग्रामीण मातृत्वाची नवी दिशा
‘मिशन एकता’ या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण भागात वंध्यत्वाविषयी योग्य माहिती पोहोचविणे, जनजागृती करणे आणि परवडणाऱ्या पद्धतीने उपचार उपलब्ध करून देणे हे आहे.
या मोहिमेत सामान्य वैद्य, आरोग्य कर्मचारी तसेच वेलनेस प्रॅक्टिशनर्स यांचा सक्रिय सहभाग राहणार असून, ग्रामीण कुटुंबांना मातृत्वाची आशा आणि आनंद देणे हा मिशन एकता चा केंद्रबिंदू आहे.

डॉ. एकता वाबळे यांनी सांगितले की, “आजही ग्रामीण भागात वंध्यत्वासंदर्भातील माहिती, समुपदेशन व उपचारांचा गंभीर अभाव आहे. मिशन एकता द्वारे Momable Fertility Center ही उणीव दूर करण्यासाठी कार्यरत राहतील.”
कुटुंब वैद्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
CME मध्ये कुटुंब वैद्य यांची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यावर रुग्णांचे समुपदेशन, आवश्यक तपासण्या व योग्य वेळी तज्ञाकडे मार्गदर्शन करण्याचे काम कुटुंब वैद्य करू शकतात. त्यांच्या सहकार्यानेच ग्रामीण स्तरावर वंध्यत्व उपचार अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे या वेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी वरिष्ठ डॉक्टर
डॉ. सुहास कोल्हे, डॉ. सुधाकर पेटकर, डॉ. जी. पी. शेख
डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. बाळासाहेब कानवडे,
संगमनेर तालुका जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनचे
डॉ. संदीप आरगडे, निमाचे डॉ. विशाल ताम्हाणे, डॉ. अमोल वालझाडे, डॉ. विकास करंजेकर,
अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे डॉ. आसिफ तांबोळी, निमा महिला फोरमच्या अध्यक्षा डॉ. संगीता रसाळ, सचिव डॉ. विशाखा पाचोरे, डॉ. किरण चांडक, डॉ. शुभदा देशमुख, डॉ. माधवी गणोरे, डॉ. रवींद्र चांडक तसेच या कार्यक्रमासाठी NIMA Women’s Forum च्या वरिष्ठ महिला डॉक्टर्स, स्थानिक आरोग्यसेवक व Momable Fertility Center चे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ‘मिशन एकता’ या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील कुटुंबांना मातृत्वाचा आनंद देणारा Momable चा मिशन एकता हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.
