संगमनेर सॅफ्रॉनच्या अध्यक्षपदी ॲड. कल्याण कासट

0
33

सचिवपदी सुमित मणियार तर खजिनदारपदी नामदेव मुळे यांची निवड

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लायन्स क्लब ऑफ संगमनेर सॅफ्रॉन सफायरचा 20 वा पदग्रहण समारंभ मंगळवार दि. 1 जुलै रोजी मालपाणी लॉन्स येथे पार पडला.‘थश डर्शीींश‘ हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून सामाजिक कार्य करणार्‍या संगमनेर सॅफ्रॉन सफायर या नावजलेल्या क्लबच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. कल्याण कासट, सचिवपदी सुमित मणियार तर खजिनदारपदी नामदेव मुळे यांची निवड करण्यात आली.
पदग्रहण समारंभासाठी पदग्रहण अधिकारी म्हणून पुणे येथील माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एमजेएफ ला. बी. एल. जोशी, प्रमुख अतिथी म्हणून माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन ला. गिरीष मालपाणी, दीक्षा प्रदान अधिकारी ला. देविदास गोरे, ला. व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (1) श्रेयस दिक्षीत, झोन चेअरपर्सन ला. सीए. प्रशांत रूणवाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा यांनी नवीन पदाधिकार्‍यांना पदभार सुपूर्द केला. या समारंभासाठी श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी साई, राहाता,सिन्नर, संगमनेर लायन्स क्लब तसेच रोटरी क्लब संगमनेरचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शपथ पत्राचे वाचन करून नूतन पदाधिकार्‍यांना शपथ देण्यात आली. माजी अध्यक्ष ला. स्वाती मालपाणी यांनी सन 2024-25 साली झालेल्या सर्व उपक्रमांचा आढावा यावेळी उपस्थितांना दिला. या कार्यकाळात एकूण 30 सामाजिक उपक्रम स्वाती मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, सर्व माजी अध्यक्ष तसेच सदस्यांचे संपूर्ण वर्षभर मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे स्वाती मालपाणी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. प्रवर्तन अधिकारी ला. देविदास गोरे यांनी संगमनेर सफायरमध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या 28 नूतन सदस्यांना यावेळी शपथ दिली. प्रमुख अतिथी ला. श्रेयस दिक्षीत यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी झालेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. संगमनेर सफायर हा जगातील सर्वात मोठा क्लब असून ला. गिरीष मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक चांगली कामे केल्याचे त्यांनी सांगितले. डिस्ट्रिक्ट पातळीवर ला. सुनिता मालपाणी यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. नूतन सदस्यांना लायनिझमचे कार्य ला. गिरीश मालपाणी यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष कल्याण कासट यांचे वडिल स्व. कैलासनाथ, आई राजनी, भाऊ कुशवर्त, वहिनी, पत्नी प्रियंका, मुले आरव, अवनी, आराना आणि बीडचे मामा मा. नगराध्यक्ष जवाहर सारडा यांच्या पाठिंब्यामुळेच कल्याण कासट यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्याचे मालपाणी यांनी सांगितले.


ला. बी. एल. जोशी यांनी लायन्स सॅफ्रॉन सफायरच्या कामाचे कौतुक केले. सफायर बिजनेस एक्स्पो, एक हात मदतीचा, वृक्षारोपण, रक्तदान, सफायर मॅरेथॉन हे उपक्रम समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लायन्स क्लबची तत्वे, कार्य उपस्थितांना समजावून सांगितली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना शपथ देताना बी. एल. जोशी यांनी जबाबदारीही समजावून सांगितली. नूतन अध्यक्षांचा परिचय ला. प्रियंका कासट यांनी करून दिला. माझ्या कार्यकाळात गरजू शाळांना टॉयलेटचे वाटप, वृक्षारोपन, रक्तदान शिबीर यासारख्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचे नूतन अध्यक्ष कल्याण कासट यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकीची जाण असल्याने येणार्‍या कार्यकाळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण काही नवीन उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी क्लबमध्ये चांगले काम करणार्‍या सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार सचिव सुमित मणियार यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here