वर्धापन दिनानिमित्त देशमुख मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटलमध्ये आरोग्य व रक्तदान शिबीर

0
1190

अधिक माहिती व नांव-नोंदणीसाठी संपर्क 9143752752
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
रुग्ण सेवेचा प्रदिर्घ वारसा व रुग्ण आणि त्यांच्या परिवाराचा विश्‍वास, प्रेम आणि सहकार्याच्या पाठबळावर येथील नामांकित देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने अविरत रुग्णसवेचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे. डॉ. अमेय देशमुख, डॉ. निलेश देशमुख, यांच्या अधिपत्याखाली डॉ. ऋतुजा देशमुख, डॉ. तेजस्वीनी देशमुख, डॉ. अनिल देशमुख, डॉ. आनंद दुग्गड, डॉ. अनुप्रित सातपुते, डॉ. शुभदा देशमुख, डॉ. सुजाता आंबेडकर यांच्या सारख्या नामांकित व अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक रूग्णांवर यशस्वी उपचार व अनेक अवघड अशा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 11 जून 2024 रोजी मोफत भव्य सर्वरोग निदान व भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.


देशमुख मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सह्याद्री शाळेजवळ, नाशिक-पुणे हायवे, संगमनेर. या ठिकाणी सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 पर्यंत हे आरोग्य शिबीर असणार आहे. दरम्यान रुग्णांनी तपासणीसाठी येताना पूर्वीचे रिपोर्ट सोबत घेऊन येणे असे आवाहन डॉ. अमेय देशमुख यांनी केले तर या शिबीरात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. निलेश देशमुख यांनी केले आहे. अधिक माहिती व नांव-नोंदणीसाठी संपर्क 9143752752 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here