शहर पोलिसांकडून आठवड्याभरात ७३ गोवंश जनावरांची सुटका

संगमनेर ( प्रतिनिधी)-
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही जनावरांची कत्तल करुन गोमांसाची विक्री व वाहतूक होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
रविवारी पहाटे घारगाव शिवारात पोलिसांनी अलिशान कारमधून एक हजार किलो गोमांस वाहतूक करताना पकडले. या कारवाईत 2 लाख रुपयांचे गोमांस आणि 3 लाख 50 हजार रुपयांची कार असा एकूण 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरुन एका अलिशान कारमधून गोमांसाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने घारगाव शिवारात सदर कार (क्र. एमएच. 46, एक्स. 6305) पकडली असता तिच्यात दोन लाख रुपयांचे एक हजार किलो गोमांस मिळून आले.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश व गोमांस संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 2 जुन ते 7 जुन दरम्यान वेगवेगळ्या परिसरात छापे टाकण्यात आले. या कारवाईत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला एकुण 17 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर सदर छाप्यांमध्ये एकुण 73 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. त्याची किमंत तब्बल 32,30,000 इतकी आहे. गोवंश जनावरांना देखभालीसाठी जिवदया गोशाळा, सांयखिडी येथे पाठविण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग डॉ. कुणाल सोनवणे यांचे आदेशान्वये, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. रावसाहेब लोंखडे, पोसई. समीर अभंग, पोसई. रमेश पाटील, पोसई. इम्रान खान, पोकों. विशाल कर्पे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहीदास शिरसाठ, अजित कुन्हे, संतोष बाचकर सर्व नेमणुक संगमनेर शहर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पथकातील पोना. राहुल डोके, पोकों. राहुल सारबंदे व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

याप्रकरणी पोकॉ. चंद्रकांत मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी ईमाम हुसेन शेख (वय 28, रा. कोकरिया नगर, सायन कोळीवाडा, मुंबई) व अजिम अन्सारी (रा.क साईवाडा, जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख रुपयांचे गोमांस आणि साडेतीन लाख रुपयांची कार असा. एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. एन. एम. ढोकरे हे करत आहे.