अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर येथील नामांकित गंगासृष्टी (व स्मार्ट स्क्वेअर डेव्हलपर्स) यांना बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्रातील उत्कृष्ट व्यावसायिक योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. रीसील इन यांच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, गंगासृष्टी (व स्मार्ट स्क्वेअर डेव्हलपर्स) च्या संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, एकजुटीचा आणि उत्कृष्ट टीमवर्कचा गौरव असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. दर्जेदार बांधकाम, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांच्या विश्वासावर आधारित कार्यपद्धती हीच या यशाची गुरुकिल्ली ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

या यशामागे संस्थेचे मार्गदर्शक स्व. अशोक गंगाधर गुंजाळ आणि स्वर्गीय गोरक्ष गंगाधर गुंजाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन, मूल्यनिष्ठ विचारसरणी आणि प्रेरणा कायम राहिली आहे. तसेच संस्थेच्या वाटचालीत ज्येष्ठ संचालक सुभाष गंगाधर गुंजाळ आणि ज्येष्ठ संचालक शिरीष गंगाधर गुंजाळ यांच्या अनुभवी नेतृत्वाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
सध्याच्या काळात संस्थेचे संचालक विशाल सुभाष गुंजाळ, प्रशांत सुभाष गुंजाळ, राहुल शिरीष गुंजाळ आणि चि. सार्थक गोरक्ष गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गंगासृष्टी (व स्मार्ट स्क्वेअर डेव्हलपर्स) यांनी बांधकाम व गृहनिर्माण क्षेत्रात विश्वासार्हतेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.
या पुरस्काराबद्दल गंगासृष्टी (व स्मार्ट स्क्वेअर डेव्हलपर्स) यांच्या वतीने आयोजक, सहकारी, ग्राहक तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही नाविन्यपूर्ण, दर्जेदार आणि समाजोपयोगी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.


















