धन्वंतरी हॉस्पिटलवरच्या अफवा फोल; गर्भपाताच्या अफवांना डॉक्टरांचा स्पष्ट खुलासा

0
2020

संगमनेर (प्रतिनिधी)-
शहरातील धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर गर्भपात न झाल्याचा खुलासा प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. प्रवीणकुमार एकनाथ पानसरे व हॉस्पिटल धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ. पानसरे म्हणाले, धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याने एका स्त्रीचा मृत्यू झाला. अशी अर्धवट माहितीच्या आधारावर सोशल माध्यमातून बातमी फिरवण्यात आली. परंतु त्यात कुठेही तथ्थ नसून वस्तुस्थिती पुर्णतः वेगळी आहे. सदर महिला ही ९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाली होती, तेव्हा तिची स्थिती अंत्यवस्थ होती. तिची नाडी व रक्तदाब हा नमूद करण्या इतपत नव्हता. तिला पोटदुखी, मळमळ, उलटी, चक्कर व गर्भाशयातून रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे होती. सदर महिलेला अंत्यवस्थ स्थितीत अतिदक्षता विभागात दाखल करून इमर्जन्सी ट्रीटमेंट सुरू केली. तिची प्रकृती खालावलेली होती. तिला काही ट्रीटमेंट न करता पुढे हलवण्याच्या निर्णय घेतला असता तर ती वाटेत दगावण्याची शक्यता होती. तिची नाडी नॉर्मल पेक्षा खूपच जास्त वाढलेली होती. १२८/min व बीपी नॉर्मल पेक्षा खूप खाली होता ८०/६० mmhg तिच्या रक्ताचे रिपोर्ट पूर्ण Derranged (खराब) झालेले होते. एच.बी. ४.८, टी.एल. ४०३०० तिला बीपी वाढवण्याचे इंजेक्शन व ब्लड ट्रान्सफ्यूजन व सेप्टीसेमिया ट्रीटमेंट सुरू केली होती.

रात्रीतून तिची प्रकृती स्थिर करण्याचे सर्व प्रयत्न केले गेले, बारा तासात तिची प्रकृती थोडी फार स्थिर झाली आणि त्यानंतर तिची सोनोग्राफी केली व त्यात गर्भाशयात Incomplete abortion with RPOC (बाहेर केलेला अपूर्ण गर्भपात) असे आढळून आले. मग तज्ञ गायनॅकॉलॉजिस्ट (एम बी बी एस, डी जि ओ) कडून तिची गर्भपिशवीतील इनकंप्लीट अबोर्शन Check Curettage करून कंप्लीट केले व होणारा रक्तस्त्राव थांबवण्यात आला. ही सर्व ट्रीटमेंट चालू असूनही तिची प्रकृती खालावत चालली व तिचे फुफुसातील संसर्ग हा हायर अँटिबायोटिक व ऑक्सिजन देऊनही वाढत चालला होता. तिला वीस तासानंतर व्हेंटिलेटरवर घेण्याचा निर्णय हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन (एम बी बी एस, एम डी, पलमोनरी) यांनी घेतला परंतु आर्थिक परिस्थितीचे कारण सांगून नातेवाईकांनी रुग्णाला प्रवरा मेडिकल कॉलेजला हलविण्यास सांगितले. दहा तारखेला संध्याकाळी रुग्णाला बायपॅप व प्रेशर O2 सपोर्ट लावून कार्डियाक ॲम्बुलन्स मधून पीएमटी (प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी) येथे पाठविले. म्हणजेच धन्वंतरीहॉस्पिटलमध्ये रुग्ण फक्त साधारणतः 24 तास एडमिट राहिला.

Dilatation and curettage ही प्रोसिजर आपल्या येथे नॉर्मल प्रेग्नेंसी साठी केलेली नसून ते Check Curettage म्हणून केली आहे. जी एक इमर्जन्सी प्रोसिजर आहे व ती Incomplete abortion with retained products of conception साठी केली आहे असे डिस्चार्ज कार्डमध्ये नमूद आहे. ही प्रोसिजर स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी केलेली आहे. ज्यांची चौकशी सिव्हिल सर्जन समोर पूर्वीच्या मीटिंगमध्ये (दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी) झाली आहे. उपचारापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांकडून संपूर्ण हिस्टरी घेतली होती. त्यात तिने गर्भपात हा गर्भलिंग निदान करून केला आहे किंवा एक वर्षाच्या आत तिसरे बाळ नको म्हणून केला ही हिस्टरी सांगितली नाही.
आपण आपल्या रुग्णालयात गर्भपात केला नाही व करत नाही. कारण सदर रुग्णाचा गर्भपात हा ५ एप्रिल २०२५ तारखेच्या आधी झाला होता. कारण ५ तारखेच्या रुग्णाच्या आधीच्या सोनोग्राफीत Incomplete abortion with retained products of conception दिलेले होते. जो रिपोर्ट सिव्हिल सर्जनकडे आहे. Emergency Check Curettage ही प्रोसिजर Life saving असल्याने त्यास Life saving procedure म्हटले आहे. आम्ही फक्त लाईफ सेविंग उद्देशाने ही प्रोसिजर केली आहे. रुग्ण हि गर्भपातासाठी आलेली नव्हती. तो अंत्यवस्थ परिस्थितीची ट्रीटमेंट करण्यासाठी आलेली होती. गर्भपाताची ट्रीटमेंट तर रुग्णांनी ५ एप्रिल २०२५ आधीच बाहेर केलेली होती. त्यामुळे आपले Tertiery Private center असल्याने दुसरीकडे संदर्भीय केले नाही. आय सी यू, व्हेंटिलेटर, ओटी कन्सल्टेशन सर्वकाही अध्ययवत सेंटर असल्याने आम्ही रुग्ण हा पूर्णपणे त्याचा जीव वाचविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एडमिट केली.

रुग्णाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही कोणतेही डिपॉझिट न घेता २४ तास पूर्ण इमर्जन्सी लाईफ सेविंग प्रोसिजर केली व रुग्ण पुढे पाठवताना अत्यल्प बिल घेऊन डिस्चार्ज केले. गरोदर मातेचा दोन मुली व गर्भपाताच्या गोळ्या घेणे व गर्भलिंग निदान करणे याच्याशी रुग्णालयाचा काहीही संबंध नाही ते गर्भलिंग निदान होते की एक वर्षाच्या आत नको असलेले प्रेग्नेंसी होती याबाबत रुग्णांनी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. इनकंप्लीट अबोर्शनच्या केसची एम एल सी किंवा ग्रामीण रुग्णालयाला कळविणे हे ज्ञात असलेल्या कोणत्याही कायद्यात आहे हे ज्ञात नसल्याने व इमर्जन्सी ट्रीटमेंटच्या व्यस्ततेत एमएलसी किंवा ग्रामीण रुग्णालयाला कळवले गेले नाही तरी सदर रुग्णाची एम एल सी ही पी. एम. टी. येथे केलेली आहे. (एम एल सी नं. १२९२)सदर रुग्ण कुठल्याही प्रकारचा नातेवाईक, घरोबा, अर्थपूर्ण पूर्वसंबंध, आमच्याशी निगडित नसल्याने आम्ही त्यांच्या कुठल्याही भावनिक कृत्यात सहभागी होऊन मदत केलेली नाही. त्यामुळे हाॅस्पिटलची होत असलेली बदनामी थांबवावी असे या खुलाश्यात डॉ. पानसरे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here