सौ. पियुषा ठोंबरे मानाच्या पैठणीच्या विजेत्या

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवणारे दंडे गोल्ड अँड डायमंड्स यांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संगमनेर येथे महिलांसाठी खास झिम्मा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम दि. 12 मार्च रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे उत्साहात पार पडला.
महिलांच्या आनंदासाठी आणि त्यांना एकत्र येऊन सांस्कृतिक परंपरा जपण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात खेळ पैठणीचा हा विशेष उपक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. या कार्यक्रमात संगमनेर शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सौ. पियुषा ठोंबरे या मानाच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. यावेळी लकी ड्रॉ देखील घेण्यात आला असून त्यामध्ये एका भाग्यवान महिलेला सोन्याचे कॉईन भेट म्हणून देण्यात आले.
या प्रसंगी दंडे गोल्ड अॅड डायमंड्स यांनी त्यांच्या 100 व्या वर्षात पदार्पणाचा सोहळा देखील याच कार्यक्रमाद्वारे जाहीर केला. तसेच या 100 व्या वर्षानिमित्त ग्राहकांसाठी पुढील काळात विविध नवीन आणि वेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना दंडे गोल्ड अॅड डायमंड्स तर्फे भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित महिलांनी असा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दंडे गोल्ड अॅड डायमंड्स यांचे आभार व्यक्त केले.






















