संगमनेरात दुध उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण

0
890

शिव आर्मी शेतकरी संघटनेचे संगमनेर बसस्थानकाजवळ धरणे आंदोलन

संगमनेर (युवावर्ता प्रतिनिधी )
दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शिव आर्मी शेतकरी संघटनेने संगमनेर बसस्थानकाजवळ गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या भावात चढ-उतार होत असून, त्यात पशुखाद्याचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच दूध दरासाठी अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा संगमनेरात येऊन धडकला होता. आता पुन्हा दोन दिवसांपासून दूध दरासाठी शिव आर्मी शेतकरी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानकाजवळ धरणे आंदोलन सुरू आहे. दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर द्यावा, दुधाला उसाप्रमाणे एफआरपी द्यावा व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दत्ता ढगे, पंकज पडवळ, भागवत गायकवाड, रवींद्र पवार, प्रशांत पानसरे, भाऊसाहेब हासे, सदाशिव हासे, शीतल हासे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिवसेना (उ.बा.ठा.) ने आपला पाठिंबा दिल्याचे माजी शहर प्रमुख आमर कतारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here