रायतेवाडी फाट्यावरील घटना, क्रेनच्या साह्याने कंटेनर काढला बाहेर

संगमनेर प्रतिनिधी भरधाव वेगाने नाशिकहून पुण्याला जाणार्या कंटेनरचालकाला झोपेचीडुलकी लागल्याने तो कंटेनर थेट हॉटेलातजाऊन घुसला.त्यामुळे हॉटेलमध्ये गाठ झोपलेले दत्तात्रय रंगनाथ मांडेकर ये बालमबाल बचावले मात्र या अपघातामुळे हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना सोमवारी पहाटे पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडीफाटा शिवारात घडली याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे महामार्गाच्या पूर्वेला दत्तात्रय रंगनाथ मांडेकर यांनी २ ते ३महिन्यापूर्वी हॉटेल दिव्यांका सुरू केले आहे.
रविवारी मध्यरात्री मांडेकर यांनी आपले हॉटेल बंद केले आणि हॉटेलमध्येच झोपले असता पहाटे पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अचानक भरता वेगाने नासिक हुन पुणे कडे जात असणारा कंटेनर नंबर एच आर ५५ए टी २९२६ वरील चालक यास झोपेची डुकली लागली आणि तो कंटेनर थेट मांडेकर यांच्या मालकीच्या हॉटेल दिव्यांकामध्येच घुसला. असता मोठा आवाज झाल्यामुळे हॉटेलमध्ये झोपलेले दत्तात्रय मांडेकर झोपेतून जागे झाले आणि समोरील दृश्य पाहू चांगलेच घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक जमा झाले त्यांनी हॉटेलची पाहणी केली असता या हॉटेलमधील डीफ्रीज, काऊंटर खुर्च्या टेबल, हॉटेलच्या किचनमध्ये असणाऱ्या सर्वच साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या अपघाताची माहिती समजताच संगमनेर संगमनेर शहरपोलीस घटना स्थळी दाखल झाले क्रेनच्या साह्याने या हॉटेलात घुसलेला कंटेनर बाहेरकाढण्यात आला चौकट पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी फाटा शिवारात असणाऱ्या दत्तात्रेय मांडेकर यांच्या मालकीच्या हॉटेल दिव्यांकामध्ये भरघाव वेगामध्ये आलेला कंटेनर घुसला. त्यामुळे हॉटेल मधील लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच या हॉटेलमध्ये स्वयंपाक गृहामध्ये गॅस टाक्या होत्या जर या गॅस टाकीचा स्पोर्ट झाला असता तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती परंतु सुदैवाने गॅस टाकीचा स्फोट झाला नाही त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला,