अल्पावधीत दामदुप्पटच्या आमिषाने अनेक जण कंगाल
या शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूकदाराला पाच हजार रुपये पासून पुढे गुंतवणूक करावी लागत होती. त्यानुसार अनेक जणांनी पाच हजार पासून लाख रुपयांपर्यंत यात गुंतवणूक केली. एजंट मार्फत गुंतवणूक केल्यानंतर पंधरा दिवसांत पैसे दामदुप्पट होत होते. सुरवातीला काही जणांना ते मिळाले देखील. मात्र अधिक लालसेपोटी त्यांनी पुन्हा यात अधिक पैसे गुंतविले. मात्र त्यानंतर पैसे काढण्यासाठी पुन्हा कंपनीकडून अधिक पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा पैसे भरले त्यांचे व ज्यांचे काढायचे होते या सर्वांचे पैसे कंपनीने हडप केले व ते अॅप देखील बंद करण्यात आले. आता कोणीही याची जबाबदारी घेत नसल्याने व पोलीस देखील तांत्रिक अडचणीचे कारण देत हात वर करत असल्याने या गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे लावल्यास बँक, पतसंस्था, एलआयसी, म्युच्युअल फंड, सावकारकी यापेक्षा जलद गतीने पैसे दामदुप्पट होतात. या फसव्या आश्वासनाला केवळ संगमनेरातील जनताच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील जनता बळी पडली आहे. या तथाकथित शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत नागरीकांनी आपल्या कष्टाचे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु आता हि कंपनी व त्यातील प्रमुख एजंट फरार झाल्याने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक होऊन अनेक जण कर्जबाजारी व कंगाल झाले आहे. या फसवणूकीबाबत पोलीसही हात झटकत असल्याने गुंतवणूकदार प्रचंड हतबल होताना दिसत आहे.
तालुक्यात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यामार्फत पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणात व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखविले गेले. यामध्ये बँका, पतसंस्थांपेक्षा जास्त परताव्याच्या आश्वासनांना बळी पडून हजारो नागरिकांनी एजंटांमार्फत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र व्याजाचा लाभ तर मिळालाच नाही तर मुळ मुद्दल देखील लुटली गेली आहे. सद्यस्थितीत सर्व कंपन्यांचे ट्रेडर्स व एजंट फरार झाले आहेत. त्यामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. जवळची सर्व रक्कम गेल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, मोर्चे, निवेदने देत आहेत. फसवणूक झालेल्यांच्या फिर्यादीवरून कंपन्या व एजंटांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना पकडून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावेत अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत.
शेती, दागिने गहाण ठेवून, बचतगटांतून कर्ज काढून, जनावरे विकून या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविले आहेत. मात्र त्यांची फसवणूक झाल्याने त्यांचे सर्वस्व हिरावले गेले आहे. आरोपींच्या मालमत्ता जप्त होवून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आह