आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश !

संगमनेर दि.५ प्रतिनिधी
तालुक्यातील भोजापुर चारीवर अवलंबून असणाऱ्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने चारी दुरुस्ती साठी महायुती सरकारने १४कोटी ४६लाख २१हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.पूर चारीच्या कामासाठी आ.अमोल खताळ यांचा विशेष पाठपुरावा होता असेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील निमोण पिंपळे कर्हे सोनेवाडी सोनोशी नान्नज आणि तीगाव माथा या भागाला भोजापूर धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे म्हणून चारीची दुरुस्ती करणे गरजेचे होते.यासाठी आ.अमोल खताळ यांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता.जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाभ क्षेत्रातील शेतकर्याना चारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही दिली होती.
चारीचे काम निर्धारीत वेळेत व्हावे तसेच निधीची कमतरता भासू नये यासाठी मंत्री विखे यांनी चारीचे कार्यक्षेत्र जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे घेतले आहे या चारीच्या दुरुस्तीसाठी यापुर्वी मंत्री विखे पाटील यांनी अडीच कोटी रुपये मंजूर केले होते. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे चारीचे काम होवू शकले आणि यंदा प्रथमच पुराचे पाणी लाभक्षेत्राला प्रथमच पाणी मिळू शकले.माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनीही भोजापूर चारीच्या कामात विशेष लक्ष घातल्याने या चारीचे निर्धारीत वेळेत सुरू होवून पूर्णत्वास जाईल असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
भोजापुर धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी निमोण व तळेगावा या भागातील गावांना देऊन हा भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी भोजापुर चारीची दुरुस्ती करणे आवश्यक होते.या कामासाठी १४कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. वर्षानुवर्ष पाण्यापासून वंचित राहीलेल्या गावांना महायुती सरकारने निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.




















