
युवावार्ता (प्रतिनिधी)- मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर फेस्टिव्हल च्या 17 व्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये गणेशाची आरतीसाठी हसंगमनेरचे लोकप्रतिनिधी आ. अमोल खताळ सहभागी झाले होते. आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की संगमनेर तालुका सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक तालुका आहे. मालपाणी उद्योग समूह आणि राजस्थान युवक मंडळाचे काम मोठे असून यावर्षी 11 वर्षांनी होणारी मिरवणूक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले.
सर्वांचे आभार मानल्यानंतर आमदार अमोल खताळ माघारी निघाल्यानंतर गुंजाळ नावाच्या एका माथेफीरूने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला आहे. उपस्थितांमध्ये 20 मिनिटे गोंधळाचे वातावरण होते. आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान ही घटना समजताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मालपाणी लाॅन्स येथील घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र हल्लेखोराला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान आ. अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता.
संगमनेरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून अशा माथेफिरूवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. #dainikyuvavarta
संगमनेर मध्ये ना भूतो ना भविष्यती भव्य अशा डोळे दिपवणाऱ्या महायुतीच्या महाविजय मेळाव्याच्या अभुतपुर्व यशानंतर विरोधकांची पायाखालची वाळू सरकल्यानेच अशी विनाशकाले विपरीत बुद्धी त्यांना सुचत आहे! लोकप्रतिनिधींवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्या नराधमावर पोलीसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा समोरच्या बाजारबुणग्यांना जशास तसे ठणकावून उत्तर देण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी.
प्रकाश सानप.
जिल्हा उपाध्यक्ष,भाजपा
ओबीसी मोर्चा,उत्तर अहिल्यानगर.





















