अशोक सातपुते यांची शिवसेनेतून हकालपट्टी

0
14

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाथ संप्रदायाचे अवघडपीर सतनाथजी महाराज शिवगोरक्ष योगी आस्थाना, चितेगाव (नाशिक) यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्याच्या आरोपावरून संगमनेर येथील शिवसेनेचे माजी पदाधिकारी अशोक बबन सातपुते यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने करण्यात आली.
या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी घडलेली संपूर्ण घटना तसेच व्हिडिओ पुरावे पक्षाच्या वरिष्ठांकडे सादर केले होते. पुरावे तपासल्यानंतर पक्षाच्या शिस्तभंग कारवाईअंतर्गत अशोक सातपुते यांना पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार शिवसेना नेहमीच साधुसंतांचा आदर करत आली आहे. तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी कायम उभा राहिला आहे, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. साधुसंतांचा अपमान किंवा चुकीच्या कृत्यांना शिवसेना कधीही समर्थन देणार नाही, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here