राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान देणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड

संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)-
येथील राजकीय व सामाजिक कार्यातील जेष्ठ व्यक्तीमत्व आशीर्वाद नागरी पतसंस्थेचे संचालक अरुणराव माधवराव पुंड यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी दुपारी निधन झाले. मृत्यू समयी ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील गणेश नगर येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश (भैय्या) व अभिजीत (मुन्ना) पुंड यांचे ते वडील होते. विविध सामाजिक, राजकीय व आर्थिक संस्थामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शहरातील अमरधाममध्ये रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. अरुणराव माधवराव पुंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

















