लहान वयात मोठी कामगिरी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वयाच्या केवळ 3 वर्षे 4 महिन्यांमध्येच अर्णवी आनंद हासे हिने अवघ्या 32 सेकंदांत भारतातील सर्व 28 राज्ये व त्यांची राजधानी अचूकपणे सांगून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे.

लहानशा वयात एवढे मोठे यश मिळवून अर्णवीने संगमनेर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या विक्रमामुळे संपूर्ण कुटुंब, शिक्षक व समाजात आनंदाचे वातावरण आहे. लहान वयात मोठी कामगिरी करून अर्णवीने इतर लहान मुलांनाही प्रेरणा दिली आहे. अत्यंत कमी वयात असामान्य स्मरणशक्तीच्या जोरावर अर्णवीने हे यश संपादन केले आहे. भविष्यात ती आणखी मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास तिच्या पालकांनी व्यक्त केला आहे. अर्णवी हासे ही श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, गणेश नगर स्कूलची विद्यार्थिनी असून दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे यांची नात व युवापॉलिप्रिंटचे संचालक आनंद हासे यांची कन्या आहे. दैनिक युवावार्ता परिवार तसेच सर्व स्तरातून तीचे कौतुक केले जात आहे. अर्णवीचे अभिनंदन व शुभेच्छा.
