अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

सात वेळा आमदार आणि राज्याचे माजी मंत्री म्हणून भरीव योगदान

संगमनेर (दैनिक युवावार्ता) अकोले भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.मधुकरराव पिचड 1980 ते 2009 अकोले मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते भूषविले होते. त्यांनी दिर्घ काळ आदिवासी विकास मंत्री म्हणून विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. मधुकरराव पिचड यांनी 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास

पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी राजूर येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथून बीए एलएलबीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता. आदिवासींसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणणारे मंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. अकोले तालुक्याच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड- १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड- १९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले- १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.-

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती- मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप – राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, .

२०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले- .२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.-

मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली- मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला- आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख