पुण्याहून पुणतांबा करण्याऐवजी संगमनेर रेल्वेसाठी मोठे जनआंदोलन उभारणार

संगमनेर (प्रतिनिधी) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ संरेखना (अलाइन्मेंट) रद्द करून नवीन पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)-अहिल्यानगर- निंबळक पुणतांबा-पिंपळगाव- साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्व मंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अखेर शिर्डीमार्गे जाण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संगमनेरकर प्रचंड नाराज झाले
नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गेच होण्यासाठी आपण जनआंदोलन उभारणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगतिले आणि त्याप्रमाणे गुरूवार दि. 4 रोजी त्यांनी व्यापारी असोसिएशन हॉल येथे रेल्वे कृती समितीची बैठक पार पडली. अभी नही तो कभी नही ही घोषणा देत रेल्वेच्या प्रश्नावर आता आंदोलन केले नाही तर संगमनेरला रेल्वे कधीच येणार नाही. यामुळे संगमनेरच्या विकासाला मोठी खीळ बसेल असे आमदार तांबे यांनी सांगितले. व्यासपीठावर आ. तांबे, हिरालाल पगडाल, राजाभाऊ अवसक, प्रकाश कलंत्री, योगेश कासट, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, डॉ. मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज कर्पे, अमर कतारी, संजय फड, संध्या खरे, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, निखील पापडेजा, पप्पू कानकाटे, इसहाकखान पठाण, वसीम शेख, राजेंद्र चकोर, सुरेश झावरे,अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह शहरातील विविध संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार सत्यजित तांबे यांनी जनआंदोलन उभारण्याची मोठी घोषणा केली. याबाबत त्यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेश लंके,खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी तातडीने संपर्क साधला तर सिन्नरचे आमदार क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ, जुन्नरचे शरद सोनवणे,ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, बाबाजी काळे यांच्याशी संपर्क साधून नाशिक – पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर नारायणगाव खेड चाकण अशीच जावी याकरता तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. खरे तर विद्यमान सरकार व महायुतीतील लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाला विरोध करायला पाहिजे मात्र आता तसे न करता त्यांनी गुळगुळीत भूमिका घेतली आहे असेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न – आ. खताळ
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेवून केंद्रिय गृहमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांना भेटणार
एककीकडे राजकीय जोडे बाजूला ठेवून काम करत असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे सोशल मीडियाद्वारे माझा रेल्वे पळवविण्यात हात असल्याचे दाखवायचे, हा दुटप्पीपणा आमदार सत्यजीत तांबे सध्या करीत आहेत. अधिवेशनामध्ये रेल्वे संगमनेरमार्गेच जावी यासाठी मी सुध्दा आग्रह धरला होता. मी सुध्दा वेळोवेळी रेल्वेसाठी आवाज उठवला आहे. शेवटी संगमनेरचा आणि जनतेचा विकास करण्यासाठी परिवर्तनाच्या माध्यमातून मला जनतेने निवडून दिले आहे. आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मामा-भाचे माझ्याविरूध्द गरळ ओकत असून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गेच जावी यासाठी मी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांच्या मदतीने त्यांना सोबत घेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना भेटून रेल्वे संगमनेरमार्गेच जावी यासाठी आग्रह धरणार आहे. महायुतीच्या माध्यमातून सुध्दा आम्ही जनआंदोलन करणार असून आ. तांबे यांनी माझ्यावरील आरोप थांबवले तरच आंदोलनात आम्ही एकत्र येवू. एका बाजूला अराजकीय म्हणायचे आणि दुसर्या बाजूला आरोप करायचे हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे. एकत्र येण्यासाठी मन स्वच्छ करा. मला आमदार होऊन एक वर्ष झाले. महाविकास आघाडीच्या वतीने निवडून आलेले शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे झोपले आहेत का? असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी विचारला. केंद्रीय रेल्वेचा विषय हा लोकसभेत मांडायचा विषय आहे. सध्याचे खासदार रेल्वेच्या विषयावर मात्र मूग गिळून गप्प आहे. यावर तुम्ही काहीच बोलत नाहीत.
जीएममआरटीचे तांत्रिक कारण समोर आले असून त्यावर निश्चित तोडगा काढून आपण ही रेल्वे संगमनेरमार्गेच नेणार असल्याचे ठामपणे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
संगमनेर-पुणे मार्ग हा देशातील सर्वाधिक गर्दीचा राज्य मार्ग आहे. दररोज लाखो प्रवासी; 5-7 तास लागणारा अवघड प्रवास, चाकण चखऊउ देशातील सर्वात वेगाने वाढणार्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असून येथून नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेरकडे जाणार्या वाहतुकीची भीषण कोंडी वैताग आणि मनस्ताप सहन करायला लावणारी आहे. उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्र या दोन मोठ्या आर्थिक पट्ट्यांना जोडणारा हा पर्याय सर्वात तर्कसंगत आहे. सर्वेक्षण पूर्ण झाले, जमीन अधिग्रहणाची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली, ऊझठ (ऊशींरळश्रशव झीेक्षशलीं ठशिेीीं) तयार म्हणजे सरकारी यंत्रणेचे वर्षानुवर्षांचे श्रम वाया घालविले तसेच सध्याचा नवा जाहीर केलेला पर्याय नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर मार्गे नेला, तर अकोले-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण हा संपूर्ण पट्टा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून पुन्हा मागे पडेल म्हणून आपण संगमनेर मार्गे रेल्वे जाण्यासाठी आग्रही असल्याचे आ. तांबे म्हणाले.
या भागातील जनता रोजच्या रोज वाहतुकीच्या नरकयातना भोगते आहे. उद्योग, शिक्षण, शेती, आरोग्य-प्रत्येक क्षेत्राला या रेल्वेमुळे नवा श्वास मिळाला असता. म्हणूनच या मार्गासाठी आता मोठ्या जनआंदोलनाची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. नाशिकच्या तपोवनातील झाडतोड रोखण्यासाठी जशी पर्यायी, सर्जनशील, व्यापक लोकचळवळ उभी राहिली, तशीच चळवळ आता पुणे-नाशिक रेल्वेसाठी उभी राहायला हवी. यासाठी खालीलप्रमाणे पर्याय आहेत आणि आपण या पर्यायांचा वापर करून हे जनआंदोलन करणार आहे असे आ. तांबे म्हणाले
- सह्यांची मोहीम – लाखो लोकांचा थेट दबाव.
- विद्यार्थी व तरुणांसाठी ‘ठरळश्र ऋेी र्र्ऋीीीींश’ मॅरेथॉन – पुढच्या पिढीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी धाव.
- नाशिक-पुणे नागरिकांचा लाँग मार्च
- सोशल मीडिया मोहीम –
- संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण येथे जाहीर सभा, जनजागरण मोर्चे.
- तज्ञांची गोलमेज परिषद – ॠचठढ मार्गाचा तांत्रिक अभ्यास, पर्यायी उपाय.
- स्थानिक उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, महिला संघटना यांचा सहभाग
- निश्चितच, रेल्वेचा मार्ग सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गेच असावा हा आग्रह केवळ भावनिक नाही; तो अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि भविष्योन्मुख आहे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी या करता महारेल विभागाने सर्वेक्षण करून संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांना भूसंपादनाचे पैसेही दिले. मात्र सत्ता बदलली आणि राजकीय स्वार्थासाठी रेल्वेचा मार्गही बदलला गेला पुण्यावरून पूणतांबा करणार्या या रेल्वे मार्गाला संगमनेर,सिन्नर,जुन्नर, नारायणगाव येथील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे. या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम व डिजिटल कॅम्पिंग सुरू झाली असल्याचे हिरालाल पगडाल यांनी सांगितले.
सोमेश्वर दिवटे यांनी सांगितले की, संगमनेर तालुका वैभवशाली बनवताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या शेजारी काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी योगदान दिले. याचबरोबर तालुक्याच्या उत्तरेकडून समृद्धी महामार्ग जातो आहे. नव्याने सुरत – हैदराबाद महामार्गाचे भूसंपादन तालुक्यातून झाले आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून उजवा व डाव्या कालव्यातून तालुक्याला पाणी मिळत आहे. शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आहे. नाशिक पुणे महामार्गाची चौपदरीकरण झाले असून काँक्रीटचे काम पूर्णत्वास जात आहे. याचबरोबर विकासाला चालना देणारी नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मधून व्हावी याकरता सर्व काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार बदलले आणि आता राज्यात आणि देशात महायुती आणि महाशक्तीचे सरकार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व सत्ताधार्यांनी नाशिक पुणे रेल्वे चा मार्ग बदलवला आहे. सिन्नर – शिर्डी – अहिल्यानगर – पुणे असा पुण्यावरून पूणतांबा हा उलटा होणारा प्रवास. लागणारा जादा वेळ आणि गैरसोय यामुळे या रेल्वेचा कोणताही फायदा मूळ मार्गावर होणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये घोषणा करतात संपूर्ण संगमनेर विभागामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
यावर संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडू असे गुळगुळीत उत्तर दिले कारण विद्यमान पालकमंत्री यांच्या निर्णयापुढे ते जाऊ शकत नाही असा टोलाही दिवटे यांनी लगावला. संगमनेरकरांच्या लढ्यामध्ये सहभागी होणे त्यांना अवघड झाले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधातही संगमनेर तालुक्यातील तरुणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून संगमनेर तालुक्याची अस्मिता जपण्याकरता सर्वांनी राजकीय जोडी बाजूला ठेवून या जनआंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रेल्वे कृती समितीने केले आहे.




















