प्रभाग पाच : ग्रीन सिटीचे आदर्श मॉडेल, विश्वास मुर्तडकांचा प्रभावी प्रचार

0
420

प्रभाग 5 हा संगमनेरचा आदर्श प्रभाग – विश्वास मुर्तडक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील आदर्श विकासाचा अनोखा नमुना म्हणून ओळखला जाणारा प्रभाग क्रमांक पाच आज ग्रीन सिटी व गार्डन सिटी म्हणून शहरात विशेष स्थान मिळवून आहे. या प्रभागातील जीवाभावाच्या नागरिकांनी वेळोवेळी दाखविलेल्या अटळ विश्वासामुळे मला शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी लाभली असल्याचे संगमनेर सेवा समितीचे उमेदवार विश्वास मुर्तडक यांनी सांगितले.
प्रभागातील सर्वांगीण विकासाच्या यशस्वी कामगिरीची माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले की, चांगले रस्ते, भुमिगत गटारी, मुबलक पाणीपुरवठा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहानग्यांसाठी आधुनिक गार्डन आणि खेळण्याची मैदाने, शहरातील सर्वात मोठे व स्वच्छ सुलभ शौचालय, धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचे वातावरण, तसेच कोरोना काळातील दिलासा आणि आरोग्य शिबिरे या सर्व विकासकामांची उभारणी केवळ आपल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे शक्य झाली.

या प्रभागातील बहुतांश मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मागील काळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आ. सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मोठे यश मिळाले आहे. आता हा प्रभाग शहरातील एक सर्वात सुंदर प्रभाग बनविण्याचे आपले स्वप्न आहे. नागरीकांची नेहमीच साथ असल्याने हे स्वप्न देखील लवकरच सत्यात उतरविले जाईल. प्रभागात काही प्रश्न असले तरी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण पुढील काळतही कटीबद्ध आहोत. निवडणूक हे केवळ निमित्त आहे. संगमनेर सेवा समितीच्या एकात्रित प्रयत्नातून पुढील काळात या प्रभागात भरीव काम उभारण्यात येणार असल्याचा शब्द या निमित्ताने आपण देत असल्याचे विश्वास मुर्तडक यांनी सांगितले.


हा प्रभाग माझे कर्तव्य, माझा अभिमान आणि माझी जबाबदारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंह या चिन्हावर आपली सेवा करण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आहे. आपण निश्चितच मला संधी द्याल, असा मला ठाम व नम्र विश्वास आहे, असे विश्वास मुर्तडक यांनी नागरिकांना आवाहन केले.
प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रचार मोहीम जोमात सुरू झाली आहे. सिंह चिन्हावर मतदान करून प्रभागाचा विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात आले आहे. ग्रीन सिटीचे मॉडेल प्रभाग पाच, पुन्हा एकदा विकासाचा संकल्प!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here