आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर ( प्रतिनिधी ) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक व अद्यावत घरे मिळावी याचबरोबर प्रशस्त कार्यालय व इतर सुविधा मिळावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून 53 कोटी रुपयांच्या निधीमधून पोलिसांचे ड्रीम होम चे स्वप्न साकार होणार आहे.
पोलीस दल हे अत्यंत महत्त्वाचे असून शहर व समाजाच्या सुरक्षाची व्यवस्था ते करत असतात. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांची सुरक्षितता याचबरोबर त्यांना चांगल्या सुविधा मिळावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून 25 मे 2023 रोजी 53 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
या निधीमधून अद्यावत पोलीस लाईन प्रकल्प साकारला जाणार असून यामध्ये सुसज्ज व आधुनिक अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासी व्यवस्था प्रशस्त कार्यालय, गार्डन, पार्किंग, सुशोभीकरण, प्रशिक्षण केंद्र यांचा सर्व सुविधा मिळणार आहेत. यामुळे पोलीस दलांचे अत्याधुनिक घरांचे स्वप्न साकार होणार आहे. हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ड्रीम होम चा प्रोजेक्ट असून माजीमंत्री माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून हा ड्रीम होम प्रोजेक्ट साकार होणार आहे.

संगमनेर हायटेक करण्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा वाटा मोलाचा – सोमेश्वर दिवटे

संगमनेरमध्ये हायटेक बस स्थानक सह पंचायत समिती,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय,कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, तालुका पातळीवरील सर्वात भव्य क्रीडा संकुल, उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृह, हॅपी हायवे,बायपास, नवीन कोर्ट, प्रवरा नदीवरील विविध पूल,भूमिगत गटारे,शहरांमध्ये विविध गार्डन असे अनेक पायाभूत सुविधा असलेले प्रकल्प उभे राहिले आहेत.
याचबरोबर निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे संगमनेर शहरवासीयांना 24 तास मुबलक व स्वच्छ पाणी मिळत आहे. शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक सुविधा व विकासाच्या योजना माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून राबवल्या गेल्या आहेत. नवीन होणाऱ्या पोलीस ड्रीम होम मुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी सांगितले.





















