
मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर येथून उत्साही मतदान; 20 केंद्रांवर उसळली गर्दी
युवावार्ता (प्रतिनिधी)
मुंबई / संगमनेर / अकोले :
48 वर्षांचा समृद्ध सहकारी वारसा लाभलेल्या यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेच्या 2025 ते 2030 या कार्यकालासाठी झालेल्या निवडणुकीत संस्थापक पॅनलने बहुमतासह विजय मिळवला आहे. सभासदांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आणि विश्वासाने या पॅनलच्या सर्व उमेदवारांना यश प्राप्त झाले.ही निवडणूक रविवार, 6 एप्रिल 2025 रोजी 20 मतदान केंद्रांवर पार पडली होती. कपबशी हे निवडणूक चिन्ह असलेल्या संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी सर्व मतदार संघांतून आघाडी घेतली. बाबुराव गणपत गायकर, या पॅनलचे प्रमुख उमेदवार आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, यांनी विजयाच्या निमित्ताने सर्व सभासदांचे आभार मानले आणि यशाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीला दिले.
संस्था ही सभासदांची असून त्यांचाच विश्वास आमच्या पाठीशी आहे. हा विजय केवळ पॅनलचा नाही, तर यशोमंदिर कुटुंबातील प्रत्येक सभासदाचा आहे. पुढील काळात संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार आहे, असे गायकर यांनी सांगितले.

मतदानासाठी 20 केंद्रांवर मोठी गर्दी उसळली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर परिसरातील सभासदांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीला बख दिले. संस्थेचा पुढील विकास आणि पारदर्शक कारभार करण्याचा निर्धार करत, संस्थापक पॅनलने नवीन कार्यकाळाची सुरुवात केली आहे.
विजयी उमेदवार- सामान्य मतदार संघ: भानुदास आरोटे, भाऊ आरोटे, अंकुश बोडके, बाबुराव गायकर, मधुकर गायकर, किरण गवांदे, मंगेश हांडे, दिनेशचंद्र हुलवळे, विजयकुमार मवाळ, संतोष शिंगोटे, अमोल उगले, अशोक वाळूंज, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ- मारुती जाधव, भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदार संघ – बजरंग नागरे, इतर मागासवर्ग मतदार संघ- दिनेश फापाळे, महिला राखीव मतदार संघ: रसिका गायकर, उल्का गवांदे.





















