अमृतवाहिनी अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय हॅकॅथॉन टेक प्रग्यानचे आयोजन

0
11

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान आहे, जे गेल्या 41 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर प्रयत्नशील आहे. हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य संवर्धन आणि सामाजिक जाणीव या क्षेत्रांतही पुढे नेण्यासाठी समर्पित आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्याची परंपरा या महाविद्यालयाने निर्माण केली आहे. महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा मिळाला आहे.
महाविद्यालयाच्या उद्देशांमध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता, नेतृत्व गुण आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे समाविष्ट आहे. यासाठी कार्यशाळा, सेमिनार, प्रकल्प स्पर्धा आणि इंटर्नशिपसारखे उपक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाशी जोडले जाते आणि करिअरसाठी तयार केले जाते. येथील शिक्षणामुळे विद्यार्थी केवळ उत्तम अभियंतेच नाही तर जबाबदार आणि समाजहिताचे नागरिकही बनतात. संगणक अभियांत्रिकी विभागात आय.एस.टी.ई (ISTE) व आय.ई.ईई. सी.एस. आय (IEEE CSI) च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन टेक प्रग्यान 2025 चे आयोजन 27 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे.

तसेच या स्पर्धेसाठी विविध राज्यातून आता पर्यंत 190 संघांनी सहभाग नोंदवला आहे, आणि स्पर्धेसाठी बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी प्रायोजकत्व दिले आहे, अशी माहिती महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली.
टेक प्रग्यान 2025 स्पर्धेसाठी विविध एकूण 80 प्रोब्लेम स्टेटमेंट देण्यात आले असून त्याचे सोलुशन विद्यार्थ्यांना 21 फेब्रुवारी, 2025 पर्यंत www.avcoecompevents.tech ह्या संकेत स्थळावर नोंदवता येईल. ह्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 50,000/- द्वितीय 30,000/- आणि तृतीय 20,000/- तसेच दोन विशेष 5000/- रु ची पारितोषिक देण्यात येणार आहे. हि संपूर्ण पारितोषिक आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. मुंबई यांनी प्रायोजक केली आहे. तसेच पायबायश्री (pibythree), जीनोसीस, फिनलेटीक्स, एसदेमोन, नेटलिप अश्या विविध कंपन्याची एकूण 1,54,000/-प्रायोजकता मिळाली आहे. अजूनही देशातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशी माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर यांनी दिली. टेक प्रग्यान 2025 आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे.बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे व संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर आणि सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here