यशस्वी पिढ्या घडविणारे खामकर सर यांचे आकस्मात निधन सर्वांना चटका देणारे
- आमच्याविषयी
- ई-न्यूज
- ई-पेपर
- छोट्या जाहिरात
- प्रतिक्रिया
- फोटो गॅलरी
- मुख्यपृष्ठ
- विशेष लेख
- संपर्क
- साप्ता. संगम संस्कृती
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील जोर्वे शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून शैक्षणिक कार्य करत अनेक यशस्वी पिढ्या घडविणारे जगन्नाथ किसन खामकर सर यांचे सोमवार 23 रोजी अकस्मात निधन झाले. मृत्यू समयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती होती. विद्यार्थ्यांप्रती तळमळ, आत्मियता जपणारे, भावी पिढी सक्षम व सुसंस्कृत व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे, विविध सामाजिक प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेणारे, वाचनाची आवड जोपासणारे जग्गनाथ खामकर सर यांचे आकस्मात निधन सर्वांना चटका देणारे आहे.
सेवानिवृत्तीनंतर वाचन, संगीत, मित्रांसोबत ऋणानुबंध जपणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या खामकर सरांचा दैनिक युवावार्ता परिवाराशीही मोठा ऋणानुबंध होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवार, 23 रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ भगवान खामकर, पुतण्या विवेक खामकर, संगमनेर औद्योगिक वसाहतीतील प्रथितयश उद्योजक ज्येष्ठ चिरंजीव शतानंद खामकर, पुणे येथे बांधकाम क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व चिरंजीव निजानंद खामकर, मुलगी राजश्री ललित नलावडे, जयश्री संजय डुबे यांचे ते वडिल होते.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने जगन्नाख खामकर सर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.