Sunday, July 11, 2021

जिल्हा परिषदेची देशमुख मळा शाळा आय. एस. ओ. प्रमाणित ; कोव्हीड आपत्तीतही शिक्षकांचे कार्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक – कातोरे

संगमनेर (प्रतिनिधी )
कोव्हीड आपत्तीतही नंदादीपाप्रमाणे तेवत राहून जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्य
अद्वितीय असून जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे यांनी केले.
तालुक्यातील धांदरफळ येथील देशमुख मळा शाळा उपक्रमशील शिक्षिका वृषाली सुनील कडलग यांच्या प्रयत्नातुन कोव्हीड आपत्तीच्या पार्श्वभूमीवरही आय. एस. ओ. प्रमाणित झाली ,त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वदेश ग्रुपचे बाळासाहेब देशमाने तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे , सरपंच भानुदास शेटे , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पवार , केंद्र प्रमुख दशरथ धादवड , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब देशमाने व आय. एस. ओ. लीड ऑडिटर अनिल येवले यांच्या हस्ते आय. एस. ओ. प्रमाणपत्र वृषाली कडलग यांना प्रदान करण्यात आले.

रामहारी कातोरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की , कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणामुळे विध्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता नियम पाळून शाळा सुरू करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणासाठी ऑनलाईन हा पर्याय योग्य ठरु शकत नसतानाही विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून या शाळेतील शिक्षकांनी दिलेले शिक्षण प्रेरणादायी व जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहे. आपल्या प्रास्ताविक भाषणात वृषाली कडलग यांनी शाळा आय.एस. ओ. करण्यामागचा उद्देश स्पस्ट केला. विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी सक्षम झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वदेश ग्रुपचे बाळासाहेब देशमाने म्हणाले की , सधन असलेल्या धांदरफळसारख्या गावातील इंग्रजी माध्यमाकडे वळणाऱ्या विध्यार्थ्यांना मराठी माध्यमाकडे वळवून त्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या देशमुख मळा शाळेने इतिहास घडविला आहे. या शाळेतून भविष्यात मोठे अधिकारी व सक्षम नागरिक तयार होतील. प्रेरणादायी वक्ते अनिल येवले यांनी आय. एस. ओ. प्रणालीचे महत्त्व विशद केले. आपल्या भाषणात जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले की इंग्रजी माध्यमाकडे जाण्याची फॅशन विध्यार्थ्यांना नैराश्याकडे घेउन जाते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले विध्यार्थी जीवनात यशस्वी झालेले आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पवार यांनी तालुक्यातील इतर शाळांनी आय. एस. ओ. प्रणालीचा अंगिकार करून शाळेचा दर्जा वाढवावा असे आवाहन केले.

कार्यक्रमानंतर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट देउन शिक्षकांचा गुणगौरव केला. संगमनेर तालुक्यातील इतरही शाळांनी देशमुख मळा शाळेचा कित्ता गिरवावा असे ते याप्रसंगी म्हणाले. गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी आय.एस. ओ. बद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी राजू नागरे , गणेश डेरे ,शरद कवडे, शिवप्रसाद देशमुख , मधुकर फटांगरे , विलास शिरोळे ,अमोल जाधव , अक्षय खतोडे , चंद्रकांत कर्पे , अर्चना काळे , अर्चना वाकचौरे , अनिता हिरे , सुरेखा गोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रविंद्र कवडे यांनी तर आभार प्रदर्शन राजू नागरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...