शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व महिला व पुरुष शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सातत्याने गेली 25 वर्षे योग व प्रशिक्षण देण्याच्या कामामध्ये न थकता प्रशिक्षण देणारे माझे स्नेही योगमित्र डॉ. सुधाकर पेटकर हे तरुणांनाही लाजवतील असे महान कार्य करीत आहेत. डॉ पेटकर यांचे हे योग व प्राणायम शिबिर अतिशय प्रशंसनीय व अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सदस्य व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आम्ही नवीन वर्षात संकल्प करतो परंतु त्यामध्ये सातत्य राहत नाही. ते सातत्य ठेवण्याचा मला नेहमी आग्रह, माझ्या कामाच्या व्यापाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडूनच होत असतो.
श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था, योगवर्धिनी, दैनिक युवावार्ता, आधार फाउंडेश, संगमनेर साहित्य परिषद, रोटरी क्लब, निमा आणि महेश ज्येष्ठ नागरिक संघ, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग व प्राणायाम शिबिराच्या रोप्यमहोत्सवी समारोपात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे बोलत होते. शहरातील भंडारी मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये दररोज सकाळी एक तास असे हे शिबीर भरविण्यात आले होते. त्यामध्ये शहरातील बहुसंख्य महिला व पुरूष यांनी सहभाग घेतला.
योग आणि प्राणायाम शिबिराचा समारोप 31 डिसेंबर रोजी सकाळी पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर विविध सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात काम करणारे ऋषिकेश मोंढे, प्रदीप भाई शहा, गणेश बाहेती, दैनिक युवावार्ताचे आनंद हासे, डॉ. विनायक नागरे, सुरेशजी जाजू, ज्ञानेश्वर राक्षे, अरविंद गाडेकर, प्रा.अलका पेटकर व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी सर्व शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्व महिला व पुरुष शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
डॉ. पेटकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये गेल्या 25 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा योगाभ्यासातील अनुभव कथन केले. शरीर आणि मन यांचा योगाशी असलेला मौलिक संबंध याविषयी मार्गदर्शन करत येणार्या नवीन वर्षात योग व प्राणायम नियमित करण्याची शपथ दिली. डॉ. विनायक नागरे यांनी दैनंदिन आहाराचे महत्व पटवून दिले. शिबिरार्थींपैकी प्रतिनिधिक स्वरूपात वैशाली कुलकर्णी आणि अनिल सोमणी यांनी मनोगत व्यक्त करून पुढील वर्षी शिबिरार्थींची संख्या वाढविण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वर राक्षे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. अलका पेटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा