फुटपाथ नेमका कुणासाठी?

फुटपाथ


व्यवसायीकांचे अतिक्रमण, आणि पादचारी रस्त्यावर
युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – मोठ्या अडथळ्यांवर मात करून शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. तसेच पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ बांधण्यात आले. परंतु या फुटपाथवर सध्या या फुटपाथवर तेथील व्यवसायीकांनी, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी, छोट्या विक्रेत्यांनी ठिकठिकाणी अतिक्रमण करून हा फुटपाथ बंद केला आहे. फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना मुख्य रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे. महामार्ग असल्याने भरधाव वाहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने ठिकठिकाणी बंद करून ठेवलेले हे फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.


संगमनेर शहराचा वाढलेला विस्तार, वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या, नागरीकांची वाढती गर्दी यामुळे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. अखेर राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण करण्यात आले. संगमनेर बसस्थानक ते अमृतवाहिणी काॅलेज पर्यंत फुटपाथसह हा महामार्ग तयार होत आहे. परंतु या महामार्गावरील फुटपाथवर तेथील व्यावसायिकांनी एकतर अतिक्रमण केले किंवा दुकानाचे बोर्ड उभे करून हा फुटपाथ बंद केला आहे. तसेच काही छोट्या दुकानदारांनी, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी हा फुटपाथ झाकून टाकला आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना भरधाव वाहणाऱ्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये जा करावी लागते. त्यामुळे हा फुटपाथ नेमका कुणासाठी तयार करण्यात आला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.शहरात नवीन पोलीस निरीक्षक म्हणून आलेले भगवान मथूरे यांनी वाहतूकीला शिस्त लावण्याचे काम सध्या हाती घेतले असून या प्रश्नाकडे देखील त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख