सुप्रसिध्द सर्जन डॉ. संजय विखे ‘आयर्नमॅन’ साठी स्पेनला रवाना ; हजारो स्पर्धकांमध्ये डॉ. विखे, करण राजपाल, अमर नाईकवाडी करणार भारताचे प्रतिनिधीत्व

Photo by – Nilesh Misal (Image Photo)

संगमनेर (सुदीप हासे) – आयर्नमॅन म्हटलं की आठवतो रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि त्याने साकार केलेला मार्व्हल कॉमिक मधला अमेरिकन सुपरहिरो. टोनी स्टार्क त्याच्या खास मशिनकृत कवचातून कसा दहशतवाद्यांना संपवितो आणि हिरो बनतो हे सर्वांना माहित आहे. खर्‍या आयुष्यातील आयर्नमॅन मात्र काहीसा वेगळे आहे. ही एक जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे. एकाच दिवसात 3.8 किमी पोहणे, 42.2 किमी धावणे आणि 180.2 किमी सायकलिंग 17 तासाच्या आत पूर्ण करायचे असते. या स्पर्धेत शारिरीक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. येणार्‍या कोणत्याही संकटाला सामोरे करून जो ही स्पर्धा पूर्ण करतो त्याला आयर्नमॅन हा किताब दिला जातो.

10 जुलै रोजी स्पेन मधील विटोरिया गेस्टेज या सुंदर आणि नयनरम्य शहरात ‘आयर्नमॅन’ ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये जगभरातून 3000 खेळाडू सहभागी झाले असून भारतातून केवळ 5 खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्यामधील 3 खेळाडू संगमनेरचे प्रतिनिधीत्व स्पेनमध्ये करणार असून सर्व संगमनेरकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजय विखे, व्यावसायिक करण राजपाल, आपला बजारचे संचालक अमर नाईकवाडी हे या स्पर्धेसाठी रवाना झाले असून 10 जुलैच्या त्यांच्या प्रदर्शनाकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. डॉ. संजय विखे आणि करण राजपाल हे या आधीदेखील या स्पर्धेचे आव्हान पेललेले आहे. डॉ. संजय विखे यांनी याआधी हैद्राबाद ट्रायथलॉन 2018 मध्ये चौथा क्रमांक पटकाविला होता.

गोवा आयर्नमॅन 2019 येथे त्यांनी चमकदार कामगिरी करत 10 वा क्रमांक पटकावित अमेरिकेतील स्पर्धेसाठी पात्र झाले होते. यावर्षी कोल्हापूर येथे झालेल्या बर्गमॅन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. 2016 पासून सलग 4 वर्षे त्यांनी मुंबई मॅरेथॉन येथे यश संपादन केले. गेल्या दीड वर्षांपासून या स्पर्धेसाठी मेहनत घेणार्‍या या स्पर्धकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेकांना आ. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. संजय मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे आयर्नमॅन ?

1978 मध्ये जॉन आणि ज्यूडी यांनी आपण संपूर्ण जगभरातील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा भरवावी असा विचार केला. शारिरीक, मानसिक आणि बौध्दिक कसोटी या जोरावर ही स्पर्धा भरवावी हा विचार त्यांनी केला. तलाव किंवा नदीमध्ये 3.8 किमी पोहणे, 42.2 किमी धावणे आणि 180.2 किमी सायकलिंग 17 तासात पूर्ण करण्याचे आव्हान त्यांनी ठेवले. ही स्पर्धा आता 40 हून अधिक देशांमध्ये भरविली जाते. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या सहा खंडातील देशाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. या स्पर्धेचे आव्हान केवळ पुरूषच पेलतात असे नाही. महिलासुध्दा या स्पर्धेत हिरारीने भाग घेतात. पुण्यातील डॉ. कौस्तुभ राडकर यांनी याआधी ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकाविलेला आहे आणि ही 30 वेळा कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी https://www.ironman.com/im-vitoria-course

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख