Friday, February 3, 2023

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

सामाजिक भान असलेले ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज निधन झाले आहे. पुणे येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे साहित्य :

  • ‘मूड्स’ (कवितासंग्रह)
  • ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह)
  • ‘राजधानी’ (दीर्घकथा संग्रह)
  • ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ (कादंबरी)
  • ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक)
  • ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी)
  • ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य),
  • ‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक)
  • ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन)
  • पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

लोकनेते आ. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संगमनेरात शिंदेशाही बाणा कार्यक्रम

शिंदेशाही बाणा कार्यक्रमआनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांची उपस्थितीतयुवावार्ता (प्रतिनिधी)...

वाघापूरमध्ये वडाच्या झाडाची अवैध कत्तल

वडाच्या झाडाची अवैध कत्तलहजारो पक्षी बेघर, कारभारीच झाले वैरी - वनविभागाचे दुर्लक्ष

गुंजाळ कन्स्ट्रक्शनचे विक्रम गुंजाळ यांचे निधन

विक्रम गुंजाळयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - येथील सिव्हिल इंजिनियर असलेले व शहर विकासाचे अनेक शासकीय कामे उत्कृष्ट पध्दतीने करणारे...

सर्वपक्षीय पाठिंब्याने सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित

सत्यजित तांबेआता प्रतिक्षा केवळ मताधिक्याचीयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - तांत्रिक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी...

संगमनेरच्या युवकांचे हाफ आयर्नमन स्पर्धेत यश

हाफ आयर्नमन स्पर्धेत यशसंगमनेरवासियांसाठी उद्योजकांचा दिशादर्शक सहभागयुवावार्ता (प्रतिनिधी)नुकतीच कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्टस्...