Friday, July 16, 2021

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन ; बालिका वधू मालिका, बधाई हो सिनेमामध्ये केले होते काम

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.

सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (१९८८), ‘मम्मो’ (१९९५) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते तर आई शिक्षिका होती. त्यांनी हेमंत रेगे यांच्याशी लग्न केलं. या दोघांना राहुल नावाचा एक मुलगाही आहे.

सुरेखा यांना त्यांच्या ‘बालिका वधू’ या मालिकेमधल्या भूमिकेने घराघरात पोहोचवलं होतं. तर ‘बधाई’ हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या भूमिकेसाठी त्यांना २०१८ साली राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन आल्या होत्या.
सुरेखा सीकरी यांचा जन्म १९ एप्रिल १९४५ रोजी दिल्ली येथे झाला. अल्मोडा आणि नैनितालमध्ये त्यांचं बालपण गेलं. नंतर १९७१ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी संपादन केली. सुरेखा यांचे वडील हवाई दलात होते आणि आई शिक्षिका होती. सुरेखाचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले होते. त्यांना राहुल सीकरी हा मुलगा आहे. सुरेखा सीकरी यांची सावत्र बहीण मनारा सीकरी यांचे लग्न नसिरुद्दीन शाह यांच्याशी झाले होते मनारा आणि नसिरुद्दीन यांची एक मुलगी हीबा शाह आहे.

जवळपास ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सुरेखा यांनी ‘किस्सा कुर्सी का’, ‘तमस’, ‘सलीम लंगड़े पे मत रो’, ‘मम्मो’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी भरी’, ‘जुबैदा’, ‘काली सलवार’, ‘रघु रोमियो’, ‘रेनकोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘बधाई हो’, ‘शीर कोरमा’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ यांसारख्या अनेक नावाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त सुरेखा यांनी ‘बालिका वधू’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘सात फेरे’, ‘बनेगी अपना बात’, ‘कसर’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘जस्ट मोहब्बत’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

सर्व विक्रम मोडत राज्याचा यंदाचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के ; यावर्षीही मुलींचीच बाजी ; ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या...

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन ; बालिका वधू मालिका, बधाई हो सिनेमामध्ये केले होते काम

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या...

शनिवारपासून शहराला दिवसाआड व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा ; व्हॉल्व दुरूस्ती कामामुळे पाणी कपात

संगमनेर (प्रतिनिधी)निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मेन व्हॉल्व दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार असल्याने शनिवार...

अवैध वाळू उपसा थांबवा- जोर्वे ग्रामस्थांची मागणी बोटीद्वारे होतोय बेसुमार वाळू उपसा, महसूलचा कानाडोळा

संगमनेर (प्रतिनिधी)प्रशासन व सर्वसामान्य नागरिक एकिकडे कोरोनाशी दोन हात करत असताना दुसरीकडे वाळू तस्करांना रान मोकळे मिळाल्याने...

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर ; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला...